Tarun Bharat

महिला मंत्र्यासंबंधी कमलनाथ यांच्याकडून आक्षेपार्ह टिप्पणी

‘आयटम’ असा उल्लेख : भाजपकडून निदर्शने

भोपाळ

 मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महिला मंत्री इमरती देवी यांना उद्देशून केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजप तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. चौहान यांनी मौन पाळून स्वतःचा निषेध नोंदविला आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी गुन्हा केला असून याचे प्रायश्चित वर्तमान मुख्यमंत्री करणार असल्याचे शिवराज यांनी ग्वाल्हेर येथे बोलताना म्हटले आहे. इमरती देवी यांचा अपमान हा मध्यप्रदेशच्या एका मुलीचा अपमान आहे. मध्यप्रदेशची जनता हे सहन करणार नाही, असेही चौहान म्हणाले. द्रौपदीचा अपमान झाल्यावर महाभारत घडून एका वंशाचा नाश झालेला हाच भारत असल्याची आठवण कमलनाथ यांना करून देऊ इच्छितो. महिलांचा आदर करणे आमची परंपरा आहे. परंतु कमलनाथ यांनी एका महिलेचा नवरात्रातच अपमान केल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी ग्वाल्हेर जिल्हय़ातील डबरा येथे आयोजित प्रचारसभेत कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्या संबंधी टिप्पणी करत ‘आयटम’ म्हटले होते. यावरून कमलनाथ चांगलेच अडचणीत आले आहेत. कमलनाथ यांना याप्रकरणी आता स्पष्टीकरणही द्यावे लागले आहे.

Related Stories

अभूतपूर्व असणार आगामी अर्थसंकल्प

Patil_p

झी-सोनीच्या अधिग्रहणाला मंजुरी

Patil_p

हैतीमध्ये भूकंप ; आतापर्यंत १,२९७ लोकांचा मृत्यू तर अनेक शहरं उद्ध्वस्त

Archana Banage

निकिता तोमर हत्या; दोघे आरोपी दोषी

Patil_p

मुकेश अंबानींना आता झेड प्लस श्रेणीची सुरक्षा

Amit Kulkarni

हैदराबादमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; 11 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav