Tarun Bharat

महिला संशोधिकेने शोधले कोरोना लसीचे संभाव्य घटक

Advertisements

ऑनलाईन टीम / हैदराबाद :
हैदराबाद विद्यापीठातील एका महिला संशोधिकेने कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल अशा लसीचे संभाव्य घटक शोधून काढले आहेत. 

डॉ. सीमा मिश्रा असे या महिला संशोधिकेचे नाव असून, त्या हैदराबाद विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसच्या जैवरसायन विभागात काम करतात. त्यांनी कोरोना विषाणूवर नवीन लसीचे घटक शोधून काढले असून, या लशीवर अजून प्रयोग सुरू व्हायचे आहेत. ही लस सार्स व एमईआरएस (सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम व मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या रोगांवरही परिणामकारक ठरू शकते. त्यांनी ‘टी सेल एपिटोप्स’ ही प्रायोगिक लस तयार केली असून त्या लसीच्या मदतीने कोरोना विषाणूला मारणे शक्य होणार आहे.      कोरोना या रोगावर सध्या कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने त्यावर औषधे व लस शोधण्याचे काम जगभरात सुरू आहे. त्यातच मिश्रा यांनी कोरोनावर परिणामकारक ठरेल अशा लसीचे घटक शोधले आहेत. 

मिश्रा यांनी त्यांचे संशोधन जागतिक पातळीवर मांडले आहे.  याविषयी डॉ. मिश्रा म्हणाल्या, मी शोधलेल्या लसीचे घटक म्हणजे पेप्टाइड असून त्यांच्या मदतीने करोना विषाणूला प्रतिकार केला जात असतो. ‘प्रतिकारशक्ती माहितीशास्त्रा’चा आधार घेत संगणनात्मक आज्ञावलीचा आधार घेतला तर लस कमी काळात शोधून काढणे शक्य आहे. विषाणूला प्रतिकार करणाऱ्या एपिटोप्सचा शोध घेण्यात आला असून त्याचा वापर लस तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे एपिटोप्स म्हणजे विषाणूला विरोध करणारे प्रतिपिंड असतात. संगणनात्मक मार्गाचा वापर केला तर १० दिवसात प्रायोगिक लस तयार करता येते.

Related Stories

लातूर जिल्हा बँक माफियांच्या माध्यमातून हस्तगत करण्याचा प्रयत्न – किरीट सोमय्या

Archana Banage

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ स्पष्टीकरणावर प्रियांका गांधी म्हणाल्या, माजरा क्या है?

Archana Banage

आसाममध्येही लव्ह जिहादविरोधी कायदा येणार

Patil_p

बेलवळे बुद्रुक येथे ५५ एकर ऊस जळून खाक; पाच लाखाचे नुकसान

Abhijeet Khandekar

अनिल अंबानींनी दिल्ली मेट्रोविरुद्धचा ४,६५० कोटी रुपयांचा खटला जिंकला

Archana Banage

भाजप नेत्यांचं ‘ते’ कृत्य मानवतेच्या विरोधात – प्रियांका गांधी

Archana Banage
error: Content is protected !!