Tarun Bharat

महिला सबलीकरणासाठी हवी ग्रामसभा

महिला ग्रामसभा घेण्याकडे दुर्लक्ष : अनेक समस्या उभ्या : आरोग्य केंद्रातर्फे विशेष जनजागृतीची आवश्यकता

प्रतिनिधी / बेळगाव

महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनात वाढच होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, महिलांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी विविध संघ-संस्थांनी पुढाकार घेतला होता. मात्र, आता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी तालुक्मयात महिला ग्रामसभा घेऊन त्यांच्या हितरक्षण व संरक्षणाबाबत आणि कायद्याची माहिती करून देण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, आता मागील काही वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून पावलेही उचलली जात होती. या अनुषंगाने राज्य सरकारने ग्राम पंचायतींमध्येही महिला ग्रामसभांचे आयोजन केले होते. मात्र, आता याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या ग्रामसभांमध्ये महिलांच्या सबलीकरणावर अधिक भर देण्यात येत होता. त्यांच्या संरक्षणाबाबतही विविध विषयांवर चर्चा करण्यात येत होत्या. त्यामुळे या ग्रामसभांना माहिलांनी अधिक प्रतिसाद दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण महिलांना सकस आहाराअभावी अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे विशेष करून पौष्टिक आहार पुरविण्याच्या दृष्टिकोनातून सूचना करण्यात येत होत्या. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या समस्या वारंवार उद्भवतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विशेष जनजागृती करून भर देण्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ग्रामसभा घेण्यात येत होत्या. मात्र, आता याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

महिलांना महिलांविषयीच्या कायद्यांची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना त्याबाबत समजून देण्याचे आवाहनही करण्यात येत होते. ग्रामीण भागात क्षुल्लक कारणांवरून कौटुंबिक भांडणे अधिक असतात. ती मिटविण्यासाठी महिलांनी संयम पाळावा आणि सुखी संसार करण्याकडे भर द्यावा. याबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि मूलभूत सुविधांसाठी महिलांमध्ये जनजागृती करणे का गरजेचे आहे, हे समजावून सांगण्यात येत होते.

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सूचना

महिलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या होत्या. आता त्या अधिकाऱयांनी याकडे पाठच फिरविली आहे. दरम्यान, या ग्रामसभेत बालविवाह व कायद्यांबाबत जनजागृती करण्यात येत होती. या अधिकाऱयांना विशेषकरून महिलांबाबत जनजागृतीचे आवाहन केले होते. तालुक्मयातील 59 ग्राम पंचायतींमध्ये महिला ग्रामसभा घेण्यात येत होत्या. आता याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

विविध ठिकाणी महिला दिन साजरा

Amit Kulkarni

बेळगाव पोटनिवडणूक 17 एप्रिलला

Amit Kulkarni

‘आयएनएस’ कार्यकारिणीवर किरण ठाकुर बिनविरोध

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स, सेंट मेरीज, सेंट पॉल्स, एमव्ही हेरवाडकर उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुकला महिलास्नेही पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

घरपट्टी भरण्यासाठी कर्नाटक वनमध्ये गर्दी

Amit Kulkarni