Tarun Bharat

महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना गतीने राबवा – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतीही महिला अत्याचाराला बळी पडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवाव्यात, संकटकालीन परिस्थितीत महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी `सुरक्षा ऍप’ तात्काळ कार्यान्वित करा, सार्वजनिक ठिकाणी असणाया सी.सी.टी.व्ही कॅमेयांची संख्या वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी संबंधित यंत्रणेला दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, विधी सल्लागार आशिष पुंडपळ आदींसह समिती सदस्य उपस्थित होते.

 नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेयांची तात्काळ दुरुस्ती करून घ्या, महिलांसाठीच्या 1091 हेल्पलाईनवर तात्काळ प्रतिसाद व मदत उपलब्ध करून द्या, महिला व बाल विकास विभागाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दूरध्वनी क्रमांक व हेल्पलाईन क्रमांक आदी विषयांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित महिलांची टीम तयार करून त्यांच्या माध्यमातून जिह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात प्रत्यक्ष जावून माहिती देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले.

  देशपांडे म्हणाले, जिल्हयातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची कायदेशीर पालकत्वासाठीची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. सुजाता शिंदे म्हणाल्या, कोरोनामुळे 8 अनाथ व 601 एक पालक गेलेल्या मुलांची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी विभागाकडून प्रत्यक्ष भेट  देवून माहिती घेतली जात आहे. तसेच त्यांना आवश्यक ती मदत पुरविली जात आहे.

 जिल्हाधिकार्यांनी केला थेट हेल्पलाईनवर फोन

बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 1091 या महिलांसाठीच्या हेल्पलाइन क्रमांकावर स्वतः फोन करून हा नंबर सुरू असल्याची खात्री केली. तसेच संकटग्रस्त महिलांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.

Related Stories

पंतप्रधान योजनेतील रकमांचे कालकुंद्री पोस्टामार्फत वितरण

Archana Banage

`अॅटो फायर बॉल’ करणार रेकॉर्ड रुमची सुरक्षा

Archana Banage

ऑनलाईन नोंदीसाठी परप्रांतीयांची तोबा गर्दी

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात आज १ बळी तर ८७ पॉझिटिव्ह

Archana Banage

‘वीज कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांवर अरेरावी’

Archana Banage

सुळकूड येथे हिसडा मारून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

Archana Banage