Tarun Bharat

महिला हॉकी लीगचे उद्घाटन

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्रीय युवा सेवा व क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या खेलो इंडिया महिला हॉकी लीगचे (21 वर्षांखालील वयोगटासाठी) बुधवारी येथे औपचारिक उद्घाटन केले. अनुराग ठाकुर यांच्यासमवेत क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंदर बात्रासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या लीगच्या विजेत्यास 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असून यातील 15 लाख केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आणि 15 लाख हॉकी इंडियाकडून दिले जाणार आहेत. 15 ते 21 डिसेंबर या कालावधीत या लीगचा पहिला टप्पा होत असून त्यात 14 संघांचा सहभाग असेल. या टप्प्यात एकूण 42 सामने खेळविले जाणार असून दुसरा व तिसरा टप्पा पुढील वर्षीच्या सुरुवातीला घेण्यात येईल. क्रीडा मंत्रालय व हॉकी इंडिया यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल ठाकुर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील खेळाडू तयार होण्यासाठी अशा लीगचे महत्त्व त्यांनी विशद केले.

Related Stories

जर्मनीतून भारतीय बॅडमिंटनपटूचे मायदेशी आगमन

Patil_p

पंजाबविरुद्ध लढतीत आरसीबीसमोर प्ले-ऑफचे लक्ष्य

Patil_p

हैदराबादचा ‘सनराईज’, गुंतागुंत वाढली!

Patil_p

Ind vs Eng: इंग्लंडचा दारुण पराभव; भारताने ३-१ ने मालिका जिंकली

Abhijeet Shinde

सिरिएलोकडून विश्लेषण प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p

इंग्लंडविरुद्ध टी-20 साठी सुर्यकुमार, किशन, तेवातियाला संधी

Patil_p
error: Content is protected !!