Tarun Bharat

महिलेचा ‘महिला पोलिस’ला चोप

Advertisements

राजेंद्र होळकर / कोल्हापूर

शहरातील एका नगरामध्ये आपल्याच राहत्या घरी पोलीस नाईक आपल्या सहकारी पोलीस महिलेबरोबर ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ अश्लिल चाळे करीत होता. या दोघांना संबंधीत पोलीस नाईक यांच्या पत्नीने नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे दोघांचीही भांभेरी उडाली. आपल्या पतीबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱया ‘महिला पोलिस’ला महिलांनी चांगलाच चोप दिला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधिकाऱयांनी यांची चौकशी करून दोषींच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अशा या ‘डर्टी’ प्रकरणाची जिल्हा पोलीस दलात चवीने चर्चा केली जात आहे.

 संबंधीत पोलीस नाईक आणि ती महिला पोलीस एकाच ठिकाणी काम करीत होते. याच दरम्यान या दोघांच्यामध्ये ‘शिलशिला’ सुरु झाला. याची कानोपकर्णी माहिती पोलीस नाईकच्या पत्नीला समजली. तिने त्या पोलीस महाशयाची चांगलीच कानउघडणी केली. तरीदेखील त्या पोलिसांचा महिला पोलीसबरोबर ‘प्रेमरोग’ सुरु राहिला. याबाबत मध्यत्तंरी त्या पोलीस नाईकच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांच्याकडे या दोघांच्या कृत्याविषयी तक्रार केली. त्यांची दखल घेवून पोलीस अधीक्षकांनी या दोघांची जिह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्वरीत बदली केली. तरीदेखील ते दोघे ‘चोरी चोरी चुपके चुपके’ भेटत होते.

 रविवारी (19) दुपारी पत्नी घरी नसताना ‘त्या’ पोलीस नाईकने आपल्या सहकारी महिला पोलीसाला शहरातील एका नगरामध्ये राहत असलेल्या बंगल्यामध्ये बोलावून घेतले. यांची माहिती पोलिसांच्या पत्नीला समजली. तिने आपल्या नातेवाईकासह ‘त्या’ महिला पोलिसाच्या पतीला बोलावून घेवून बंगल्यावर छापा टाकला. यावेळी तो पोलीस नाईक आणि ती महिला पोलीस ‘नको त्या’ अवस्थेत मिळून आली. पोलीस पतीला फैलावर घेत महिला पोलिसाची धुलाई केली. हा ‘बिन पैश्याचा तमाशा’ पाहण्यासाठी नगरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Stories

खाटांगळेत आशा वर्करला ग्रामपंचायत सदस्यासह चौघांकडून मारहाण

Abhijeet Shinde

‘वंचित’चे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

Abhijeet Khandekar

Kolhapur; ‘कोजिमाशि’ मतदान स्थळ निश्चितीमध्ये ‘राजकारण’

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर

Abhijeet Shinde

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मंत्र्यांकडून पाहणी

Abhijeet Khandekar

गोकुळची गरज ओळखूनच जागा खरेदी – चेअरमन विश्वास पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!