Tarun Bharat

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांंवर गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी / इचलकरंजी

आर्थिक वादातून महिलेस शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पाटील, स्वप्निल पाटील व निलेश पाटील ( सर्व रा. आरगे मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरगे मळा परिसरात घडला. याबाबत फिर्याद पिडीत महिलेने गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरगे मळा परिसरात राहणार्‍या पिडीत महिलेने शिवाजी पाटील याच्याकडे सिट्रेस कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत.

हे पैसे परत मागण्यासाठी पिडीत महिलेसह आणखी काही महिला शिवाजी पाटील याच्या घरी गेल्या होत्या. यावेळी शिवाजी पाटील याच्यासह स्वप्निल पाटील, निलेश पाटील यांनी सर्वांना शिवीगाळ केली त्याचबरोबर तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत फिर्यादी यांच्या अंगाशी झोंबाझोंबी करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

साडेनऊ लाख ग्राहकांची वीज बिल भरण्याकडे पाठ ,

Archana Banage

कोल्हापूर : सराईत चोरट्याकडून साडे आठ लाखाचा ऐवज जप्त

Archana Banage

कोल्हापूर : जम्बो हॉस्पिटलच्या प्रस्तावाचे काय झाले? खासदार संभाजीराजेंकडून जिल्हा प्रशासन धारेवर

Archana Banage

कोल्हापूर हीच माझी कर्मभूमी

Archana Banage

‘हेल्पर्स’ पुरस्काराच्या अनिता दांडेकर ‘अपंगमित्र’ च्या मानकरी

Abhijeet Khandekar

कोतवालास शंभर रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Archana Banage
error: Content is protected !!