Tarun Bharat

महिलेला एकाचवेळी दोन व्हेरियंटची लागण

बेल्जियममध्ये कोरोनाचे अनोखे प्रकरण – उपचारादरम्यान झाला मृत्यू

वृत्तसंस्था/ ब्रसेल्स

जगात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान बेल्जियममध्ये विषाणूचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेगवेगळय़ा व्हेरियंट्सचे संक्रमण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. महिलेत अल्फा आणि बीटा स्ट्रेन आढळून आला आहे. अल्फा सर्वप्रथम ब्रिटन तर बीटा सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. अशाप्रकारच्या प्रकरणामुळे कोरोनाविरोधी लढाई अधिकच अवघड होऊ शकते.

90 वर्षीय महिलेने लस घेतली नव्हती तसेच घरात राहूनच स्वतःवर उपचार करवून घेत होती. प्रकृती बिघडल्यावर तिला मार्च महिन्यात ओएलव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली  असता अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रारंभी महिलेची ऑक्सिजन पातळी चांगली होती, पण नंतर तिची प्रकृती वेगाने बिघडत गेली आणि पाचव्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला.

महिला कोरोनाच्या कुठल्या व्हेरियंटने संक्रमित झाली होती हे रुग्णालयाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्यात कोरोनाचे अल्फा आणि बीटा दोन्ही व्हेरियंट आढळून आले. संशोधक अशाप्रकारच्या प्रकरणांना गांभीर्याने हाताळण्याचा सल्ला देत आहेत.

ओएलव्ही हॉस्पिटलमध्ये मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट ऐनी वेंकरीबर्गन यांनी बेल्जियमध्ये त्यावेळी दोन्ही व्हेरियंट फैलावत होते असे सांगितले आहे. महिलेला दोन्ही व्हेरियंट्स दोन विविध लोकांकडून मिळाले असण्याची शक्यता आहे. दोन व्हेरियंटसद्वारे संक्रमित असल्याने महिलेची प्रकृती वेगाने बिघडली का यामागे अन्य कुठले कारण होते हे सांगणे अवघड असल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण अध्ययनासाठी आता युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिजिजकडे पाठविण्यात आले आहे.

Related Stories

मायनिंग सिटी किरुनाची व्यथा

Patil_p

जग चिंतेत मात्र चीनने तालिबान पुढे केला मैत्रीचा हात

Archana Banage

माकडाच्या शेपटीसारखी दाढी

Patil_p

न्यूझीलंड : पंतप्रधान अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा निवडणुकीत दणदणीत विजय

datta jadhav

तबलिगींकडून पाकिस्तानातही कोरोनाचा फैलाव

prashant_c

कोरोनापासून बचावाच्या प्रयत्नात व्हेंटिलेटरवर

Omkar B