Tarun Bharat

महुदमध्ये लॉकडाऊननंतर आता जनता कर्फ्यू

Advertisements

महूद / प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील महूद येथे आज कोरोना रुग्ण शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये नव्याने 10 रुग्णांची वाढ झाली असून येथील एकूण बाधित रुग्ण संख्या 41 झाली आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी येथील ग्राम कृतिसमितीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. यापूर्वी लॉकडाऊन देखिल सांगोला तालुक्यात झाले आहे.

महूद गावठाणा मध्ये कोरोना चा फैलाव वेगाने होत आहे. एकाच कुटुंबातील अनेक जण कोरोना बाधित आढळत आहेत. गावठाणा मधील विविध भागात  रुग्ण संख्या अधिक आहे.23 जुलैपासून  येथे कडक लॉकडाऊन चालू आहे.बँकांसह सर्व व्यवहार बंद आहेत.तरीही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोणतीही लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी येथील ग्राम कृतिसमितीने मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार येथील डॉक्टर  मेडिकल चालक किराणा दुकानदार  भाजी विक्रेते  कृती समिती मधील शासकीय कर्मचारी यांची रॅपिड चाचणी  करण्यात आली.

अधिक सामान्य लक्षणे,कमी सामान्य लक्षणे,गंभीर लक्षणे अशाप्रकारे लक्षणांचे वर्गीकरण करून चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 153 जणांची  रॅपिड चाचणी घेण्यात आली.त्यामध्ये दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले.तर रुग्णांच्या  जवळील संपर्कातील 12 जणांचे नमुने तपासणी साठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहेत. गावठाणातील वाढता संसर्ग पाहून पुढील तीन दिवसापर्यंत कृती समितीने जनता कर्फ्यू् लागू केला आहे. या काळात अत्यवस्थ रुग्णांसाठी दवाखाने उघडे राहतील. जनता कर्फ्यू काळात  मेडिकल सह सर्व व्यवहार पूर्णपणे  बंद ठेवण्यात येणार आहेत.

जनता कर्फ्यू काळात नागरिकांना औषधांची गरज भासल्यास त्यांनी आपल्या भागातील ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्राम कृती समितीची संपर्क साधावा. कोरोना वर मात करण्याकरिता शासकीय स्तरावरून कठोर उपाययोजना केली जात आहे.- बाळासाहेब ढाळे, सरपंच महूद

Related Stories

”कोणीही कितीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर व मजबूत”

Abhijeet Shinde

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

Abhijeet Shinde

राष्ट्रपती राजवटीची सर्व कारणे राज्य सरकारने पुर्ण केली – चंद्रकांत पाटील

Sumit Tambekar

सवयभानतर्फे रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बॅंक

Patil_p

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या प्रशासनाचा गडमुडशिंगीत सत्कार

Abhijeet Shinde

उपळे दुमाला येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!