Tarun Bharat

मांगले कुटंबियांच्या घरासमोर होतेय आजही ध्वजारोहण

वार्ताहर/ ताम्हाने

शासकीय कार्यालये आदी ठिकाणी ध्वजारोहण केले जाते हे आपण नेहमी ऐकतो. मात्र संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील ग्रामस्थांनी मांगले यांच्या घरासमोर ध्वजारोहणाची आगळीवेगळी प्रथा आजदेखील जपली आहे. मांगले कुटूंबियांची तिसरी पिढी ध्वजारोहणाचा कार्यक्रम तितक्याच हौसेने करत आहे. ध्वजारोहणाप्रसंगी मांगले कुटूंबियांबरोबरच सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित असतात.

देवरुख शहरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर कासारकोळवण गाव वसलेले असून हा दुर्गम भाग आहे. पुर्वी सोयीसुविधांचा अभाव असल्यानें शासकिय कार्यालये, शाळा ही खाजगी जागेत होती. याचप्रमाणे कासारकोळवण गावची ग्रामपंचायत, शाळा, सोसायटीचा कारभार गावचे पोलिस पाटील तात्या मांगले, सरपंच अण्णा मांगले यांच्या घरातून हाकला जात होता. चावडी वाचन देखील याच ठिकाणी होत असे. यामुळे याठिकाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जात होते.

कालांतराने जागा, इमारत उभारणीसाठी निधी मंजूर झाल्याने ग्रामपंचायत, सोसायटी व शाळेचा कारभार स्वतंत्र इमारतीमधून हाकला जात आहे. मात्र मांगले कुटूंबियांनी ध्वजारोहणाची परंपरा आजही जपली आहे. दुसऱया पिढीतील सुभाष मांगले व विश्वास मांगले आणि तिसऱया पिढीतील सचिन मांगले, धनंजय मांगले यांनी ही प्रथा सांभाळली आहे. प्रथम शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी व यांनतर सकाळी 9 वाजता मांगले यांच्या घरासमोर ध्वजारोहण केले जाते.

यावेळी ग्रामपंचायत, सोसायटी येथील लोकप्रतिनिधी व शाळांमधील मुख्याध्यापक, विद्यार्थी उपस्थित असतात. यावेळी जोत्स्ना तोरस्कर, अंजना घाटबाने, जयराम तोरस्कर, आत्माराम घाटबाने, रोशन कदम, सचिन मांगले, धनंजय मांगले यांसह मांगले कुटूंबिय उपस्थित होते. ध्वजारोहणाची परंपरा यापुढे अखंडीत सुरु ठेवणार असल्याचे सचिन मांगले यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन तीन बळी

Archana Banage

शाळांच्या इंग्रजी माध्यमांतरला मराठी भाषिक अभ्यासकांचा विरोधच

NIKHIL_N

रत्नागिरी : पथविक्रेता आत्मनिर्भय समितीला दापोलीकरांचा विरोध

Archana Banage

कार – दुचाकी अपघातात युवक – युवती जखमी

Anuja Kudatarkar

आचरा येथे युवकाची आत्महत्या

NIKHIL_N

रत्नागिरी : काजू दरामध्ये सातत्याने घसरण

Archana Banage