तरुण भारत

मांजराने मिळवून दिले 95 लाख

पाळीव प्राण्यावर शेजाऱयांनी भरला होता खटला

अमेरिकेत अन्ना डेनिएली यांचे पाळीव मांजर मिस्कावर त्यांच्या सोसायटीच्या लोकांनी काही आरोप केले होते. मांजर इकडे-तिकडे फिरत राहते आणि अनेकदा अन्य प्राण्यांवर हल्ला करत असल्याचा आरोप शेजाऱयांनी केला होता. संबंधित महिलेवर 25 हजार पाउंडचा दंड ठोठावण्यात आला होता. पशू नियंत्रण अधिकाऱयांनी मांजरावरून अनेक तक्रारींनतर 2019 मध्ये अन्नाच्या देखभालीतून काढून घेत स्वतःसोबत घेऊन गेले आहेत.

Advertisements

मांजरावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या तीन वर्षांनी अलिकडेच एका न्यायालयाने मांजर कधीच परिसरात हिंडत पाहिले गेले नाही आणि तसेच तिने कुठल्याही प्राण्याला त्रास दिला नसल्याचे स्वतःच्या आदेशात म्हटले आहे. मिस्का कायमच निर्दोष होती. मिस्काबद्दल तक्रारी करणारे पशू नियंत्रण अधिकारी अन्नाच्या शेजारीच राहत होते असे चौकशीतून समोर आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. किंग काउंटी आणि बेलेह्यू शहराच्या न्यायालयाने अन्ना आणि त्याच्या पाळीव प्राण्याच्या बाजूने निर्णय दिला. याचबरोबर महिलेला भरपाईदाखल 95 लाख रुपये मिळाले आहेत.

ऐतिहासिक निर्णय

हे प्रकरण बेलेह्यूमध्ये एका घरगुती मांजराचे हेते. आसपासच्या लोकांनी मांजरावर खोटे आरोप केले होते. वॉशिंग्टनमध्ये एका मांजरावरून हा ऐतिहासिक निर्णय होता असे अन्नाचे वकील जॉन जिम्मरमॅन यांनी सांगितले आहे.

Related Stories

गुलाबी रंगासोबत विवाहबद्द

Patil_p

हिंदू संस्कृतीचे प्रतीक चैत्रांगाण

Omkar B

77 वर्षीय इसमावर जडले 20 वर्षीय युवतीचे प्रेम

Patil_p

राधानगरी अभयारण्यात ब्लॅक पँथरही? अर्धवट काळा बिबटय़ा कॅमेऱयात कैद

Abhijeet Shinde

कोणतीही लक्षणे नसताना ‘ती’ 19 वेळा कोरोना पॉझिटिव्ह

prashant_c

हे आहे इंटरनेटचे सामर्थ्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!