Tarun Bharat

मांजराने रोखली भरधाव रेल्वे

एक्स्प्रेस रेल्वेला 3 तासांचा विलंब

मांजरामुळे रेल्वेला विलंब झाल्याचे कधी ऐकले आहे का? पण लंडनमध्ये खरोखरच असा प्रकार घडला आहे. इयूस्टन रेल्वेस्थानकारवून मँचेस्टर येथे जाणाऱया रेल्वेगाडीच्या छतावर एक मांजर बसलेले दिसून आले. हे दृश्य पाहून रेल्वेचे कर्मचारीही अवाप् झाले. मांजराच्या या प्रतापामुळे रेल्वे 3 तास विलंबाने धावली आहे. जर मांजराला कुणी पाहिले नसते तर 200 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणाऱया या रेल्वेच्या छतावर चढणे हाच मांजराचा अखेरचा प्रवास ठरला असता.

अवंती वेस्ट कोस्ट रेल्वे रात्री 9 वाजता मँचेस्टरसाठी रवाना होणार होती. पण रेल्वे सुटण्याच्या अर्ध्या तासापूर्वी एका व्यक्तीने छतावर मांजराला बसलेले पाहिल्याने रेल्वे तेथून हलू शकली नाही. त्यानंतर मांजराला तेथून खाली उतरविण्याचे कार्य सुरू करण्यात आले.

प्रवाशांना दुसऱया रेल्वेत हलविले

प्रवाशांना विलंब होऊ नये याकरता त्यांना अन्य रेल्वेगाडीत हलविण्यात आले. तर मांजर चढून बसलेल्या रेल्वेला सेवेतून वगळण्यात आले. 25 हजार व्होल्ट ओव्हरहेड तारेपासून मांजर खूपच जवळ असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर कर्मचाऱयांना मांजराला छतावरून उतरविण्यास यश आले. मांजर रेल्वेच्या छतावर कसे पोहोचले हे अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही पक्ष्यांना सामोरे जातो, पण पहिल्यांदाच आम्हाला मांजराला तोंड द्यावे लागल्याचे उद्गार इयूस्टनच्या नॅशनल रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक जोई हेन्डरी यांनी काढले आहेत.

Related Stories

11 अभिनेत्री, 1 गाणे… घे उंच भरारी

Patil_p

‘नो एंट्री 2’मध्ये समांथा

Patil_p

अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिवाळी साजरी

Patil_p

राधिका आपटेचा ‘तो’ फोटो पुन्हा व्हायरल ; ट्विटरवर #BoycottRadhikaApte हॅशटॅग ट्रेंडिंगवर

Archana Banage

कंगना रानौतच्या सुरक्षेबाबत हिमाचल प्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar