Tarun Bharat

मांढरदेवच्या काळूबाईची यात्रेची मुख्य पूजा साध्या पद्धतीने संपन्न

Advertisements


वाई / प्रतिनिधी
 

मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा गुरुवारपासून सुरू झाली. आज पौष पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक न्या. आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा झाली. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन न्या. एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त ऍड. महेश कुलकर्णी, ऍड. मिलिंद ओक, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, शैलेश क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे व निवडक पुजारी उपस्थित हाेते. यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मांढरदेववर व परिसरात काळूबाई यात्रेच्या निमित्ताने पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक, दहा उपनिरीक्षक, 87 पुरुष, महिला व वाहतूक पोलिस कर्मचारी, 24 होमगार्ड, एक दंगाकाबू पथक, एक जलदकृती दलाची तुकडी असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असून, मंदिर परिसरात जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मांढरदेववर भाविकांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त आहे.

Related Stories

अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद

Patil_p

रूग्णालयातील कोविड वॉर्डही रिकामे

datta jadhav

महाराष्ट्र रग्बी संघाला राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

Patil_p

कोर्टी येथे कार अपघातात दोन महिला ठार

Sumit Tambekar

अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती

Abhijeet Shinde

खंडणीप्रकरणी पाडळीच्या युवकावर गुन्हा दाखल

Omkar B
error: Content is protected !!