Tarun Bharat

मांदे मतदार संघाच्या विकासात पत्रकारांचे महत्वाचे योगदान -आमदार सोपटे

प्रतिनिधी /मोरजी

कोरोना काळात जीवावर उदारहोवून  पेडणे तालुक्मयातील पत्रकारांनी आपले कार्य अखंडित चालू ठेवले.  दररोज कोरोनाविषयी अपडेट देण्याबरोबर या विषयी समाज जागृती केली. कोरोनाग्रस्तानां आरोग्य सेवा पुरवण्यासाठी   कोरोना सेंटरचा   पाठपुरावा केला  प्रसंगी लोकप्रतिनिधीच्या चुकांवर बोट ठेवले. मतदार संघातील समस्याना सरकार दरबारी वाचा फोडली  त्यामुळे  मांदे मतदार संघाच्या विकासालाही मोठा हात भार असल्याचे प्रतिपादन मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केले. मांदे भाजपा तर्फे कोविड योद्धे म्हणून  पेडणे तालुक्मयातील पत्रकारांचा गौरव केल्यानंतर ते बोलत होते. .

मांदे येथे रविवारी आयोजित केलेल्या याकार्यक्रमाला मांदे मतदार संघ भाजपा निरीक्षक गोरख मांदेकर उपस्थित होते .

यावेळी निवृत्ती शिरोडकर ,  ,मकबूल माळगीमणी ,चंद्रहास दाभोलकर , राजेश परब , जयेश नाईक ,विनोद मेथर , संदीप कामुलकर , प्रसाद पोळजी , अस्मिता पोळजी आदींचा शाल श्रीफळ पुष्प व भेट वस्तू देवून गौरव केला .

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमेन तथा आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना , आगरकर टिळक पासून सुरु असलेली समाज प्रबोधनाची  पत्रकारिता आजही ग्रामीण भागात समर्पित भावनेने चालू आहे. पत्रकार अल्प मानधन घेवून काम करतात. त्यांच्या समस्या अडचणी आज पर्यंत कुणीच समजून घेत नाही.  त्याना आपलेच  अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो . असे सांगून , पेडणेतील सर्व पत्रकार जागृत  असल्याने विकासालाही गती मिळते असे सांगितले . पत्रकार अविरत कार्य करीत असल्याचे दाखल  घेवून भाजपा ने त्यांचा गौरव आयोजित केला आणि त्याला प्रतिसाद  दिल्याने पत्रकारांचे अभिनंदन केले .

सविस्तर तसेच निपक्षपातीपणे  वृत्त देणारे ग्रामीण  पत्रकार ; गोरख मांदेकर

मांदे मतदार संघातील पत्रकार किती जागृत आहेत हे सकाळी कोणतेही वर्तमान पत्र उघडले कि लक्षात येते , निपक्ष वृतांकन तेही सविस्तर वाचायला याच मतदार संघातील पत्रकारांचे वाचायला मिळते ,जसे आजपर्यंत पत्रकारांनी सहकार्य केले तेही यापुढे अपेक्षित आहेत असे मांदेकर म्हणाले .

Related Stories

मांद्रे सरपंचपदी ऍड. अमित सावंत यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

वास्कोतील कदंब स्थानकाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा व निदर्शने

Amit Kulkarni

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात; 22 जखमी

prashant_c

पंचायत वॉर्ड पुनर्रचना मसुदा जनतेला उपलब्ध

Amit Kulkarni

श्रावणी सोमवार दिंडी उत्सव समितीतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण

Omkar B

सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी ‘इंट्रानेट’ सुविधेचा वापर करावा विरोधी पक्षनेते श्री. कामत यांची मागणी

Omkar B