Tarun Bharat

मांदे हायस्कूल पालक शिक्षक संघातर्फे आज ’पालक दिन’

गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

वार्ताहर /पालये

मांदे हायस्कूलच्या पालक शिक्षक संघातर्फे शनिवार 12 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता ’पालक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम हे उपस्थित राहणार आहेत.

पालक दिन कार्यक्रमात शालान्त परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करताना विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच दहावीतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. याशिवाय विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे.

या कार्यक्रमात अंशिका दशरथ बर्डे, प्रिती प्रभाकर पालयेकर, अक्षया अविनाश गडेकर, सार्थक सागर केरकर, कृतिका बाबू किनळेकर, सिया सुनील पुर्खे, रविना राजन च्यारी, श्रेया शेखर मांजरेकर, सुदीप संदीप कांबळी, लवू उदय गावडे, अर्चिता साईनाथ नारोजी, मधुर दीपक शेटमांदेकर, अनिशा एकनाथ कवठणकर, वैष्णवी विद्याधर गडेकर, कौस्तुभ मच्छि?द्रनाथ कायसुकर, पियुष केशव गोवेकर, साहिल महेश किनळेकर, सानिया सुनील कोरगावकर, निखिल राजन च्यारी, अथर्व गोविंद तिळवे, स्नेहा राजन मांदेकर या विशेष श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Related Stories

राजधानीत रस्त्यांचे पुन्हा खोदकाम

Amit Kulkarni

एफसी गोवाच्या एदू बेडियाला शिस्तपालन समितीची नोटीस

Amit Kulkarni

ढवळीच्या उड्डाण पुलाचे पंचायत मंडळ व नागरिकांच्या उपस्थितीने उद्घाटन

Amit Kulkarni

मुरगावात पालिका निवडणुक प्रचाराला जोर

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयात हलक्मया पावसाच्या सरी.

Omkar B

म्हापशात आज विधिता केंकरेचा गायनाचा कार्यक्रम

Amit Kulkarni