Tarun Bharat

मांद्रे वाणिज्य महाविद्यालय प्राचार्यपदी तुषार अणवेकर

प्रतिनिधी /पणजी

मांद्रे येथील मांद्रे कॉमर्स, इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून प्रा. तुषार अणवेकर यांनी ताबा घेतला आहे. यापूर्वी ते सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्राध्यापक होते.

सुमारे 31 वर्षांचा शैक्षणिक आणि व्यवस्थापनातील अनुभव असलेल्या अणवेकर यांनी 2001 मध्ये गोवा विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी स्वतः दोन विद्यार्थ्यांना पीएडी, पाच विद्यार्थ्यांना एमफिल पदवी आणि 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एमएससी, बीएससी प्रकल्पांसाठी मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे 15 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय युजीसी आणि डीएसटीई पुरस्कृत दोन शोध प्रकल्पांवरही त्यांनी काम केले असून 50 पेक्षा जास्त चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा यातून सहभाग घेतला आहे. प्रतिष्ठेचे असे अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.

मांद्रे महाविद्यालयात प्राचार्यपदाचा ताबा घेतल्यानंतर बोलताना यापुढे आपण उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी कटीबद्ध असून या क्षेत्रात नाविन्य आणि शोधपूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक वाढ करतानाच त्यांच्यात शिस्त आणि व्यक्तिमत्व विकासावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पदाचा घेतला ताबा

Amit Kulkarni

राज्यात जोरदार पाऊस

Amit Kulkarni

म्हापशात पहिला कोविड रुग्णाचा मृत्यू – माहिती मिळाल्यावर इस्पितळात एकच धावपळ

Patil_p

कुडशे सत्तरी घराची नुकसानी होऊन1 लांखाचा फटका

Omkar B

बारावीचा निकाल 99.40 टक्के

Amit Kulkarni

मनपातर्फे मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर

Omkar B