Tarun Bharat

माकड होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत लोक

800 रुपयांमध्ये माकडउडय़ा घेण्यात होतात तरबेज

निसर्गाने विविध जीव तयार केले असून त्यातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे असे वैशिष्टय़ असते. एखादा प्राणी शिकार करण्यात चपळ असतो. तर कुणी बलशाली असतो. यातील एक माकड हा प्राणी स्वतःच्या हुशारीसाठी ओळखला जातो. माकड हे मानवांचे पूर्वज होते असे मानले जाते. याचमुळे त्याच्या अनेक सवयी माणसांशी मिळत्याजुळत्या आहेत. याचमुळे बार्सिलोनामध्ये लोक पुन्हा माकड होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.

माकडांचे झाडांवर चढणे आणि लटकून इतरत्र पोहोचण्याच्या कौशल्याचे कौतुक होत असते. माणूसही झाडांवर चढू शकतो, परंतु माकडांइतका चपळपणा माणसांमध्ये नसतो. याचमुळे बार्सिलोनात टारझन नावाने प्रसिद्ध एक व्यक्ती अजब क्लास घेत आहेत, यात तो लोकांना माकडांप्रमाणे उडय़ा मारणे अन् उंच झाडावरील फांदीला लटकणेही शिकवत आहे.

माकडउडय़ा मारण्याची इच्छा असल्यास बार्सिलोनातील एका उद्यानात चालविला जाणारा क्लास तुम्हाला आकर्षित करेल. टारझन ऑफ बार्सिलोना नावाने ओळखला जाणारा एक व्यक्ती स्पॅनिश शहरातील उद्यानात लोकांना माकड होण्याचे प्रशिक्षण देत आहे. या क्लासचे नाव ‘टारझन मूव्हमेंट’ ठेवण्यात आले आहे. यात माकडांप्रमाणे एका फांदीवरून दुसऱया फांदीवर जाणे शिकविले जात आहे. व्हिक्टर मॅन्युअल फ्लेइटिस नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या क्लाससाठी काही झाडांची निवड केली असून तेथे सहजपणे टारझन मूव्हमेंट शिकविण्यात येतात.

व्हिक्टरचा हा क्लास केवळ व्यायाम नसून यात मानसिक आणि शारीरिक शिस्तही आवश्यक आहे. टारझन मूव्हमेंट क्लासमध्ये सामील होत माकड होण्याची इच्छा अनेक लोकांनी व्यक्त केली आहे. हा क्लासमध्ये 800 रुपये भरून सहभागी होता येते. सोशल मीडियावर हा क्लास चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Stories

दिल्लीत 3609 नवे कोरोना रुग्ण; 19 मृत्यू

Tousif Mujawar

शोपियां चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

कोविड गाशा गुंडाळतोय?

Patil_p

कर्ज-बेरोजगारीने घेतला हजारोंचा जीव

Amit Kulkarni

‘पुलवामा’ची पुनरावृत्ती टाळली

Patil_p

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

datta jadhav