Tarun Bharat

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : डॉ नितीन राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न महाविकास आघाडी सरकार लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघातर्फे आयोजित एका बैठकीस संबोधित करताना दिली. मागासवर्गीय उद्योजकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ व्हावा आणि त्यांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

लोकशाहीची पाळेमुळे हे आर्थिक व सामाजिक समतेवर आधारलेली आहेत. राज्यघटनेने जरी राजकीय समतेची हमी दिली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यावर समाधान झाले नव्हते. त्यांना अपेक्षित असलेली आर्थिक व सामाजिक समता निर्माण होण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित आर्थिक व सामाजिक लोकशाही वास्तवात आणण्यासाठी मागासवर्गीयांचे आर्थिक सक्षमीकरण महत्वाचे असून मागासवर्गीयांच्या उद्योगांना सरकारी पाठबळ लाभल्याशिवाय हे शक्य होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी यावेळेस बोलताना केले.

मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना देण्यात येणाऱ्या वीज सवलतीच्या धर्तीवर मागासवर्गीय उद्योजकांना देखील वीज सवलत व जोडणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच मागासवर्गीय उद्योजकांना कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे थकलेल्या वीज बिलाचे हप्ते पाडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“राज्यातील प्रत्येक जिह्यात मागासवर्गीय समाजातून उद्योजक निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी लवकरच एक कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले जाईल. आतापर्यंतच्या मागासवर्गीय सहकारी संस्थांचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील व भविष्यातील मागासवर्गीय उद्योजकता विकासाचा आराखडा (रोडमॅप) तयार केला जाईल. मागासवर्गीय उद्योजकांना योग्य दर्जाची अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी काय पावले उचलावित याचाही विचार कृती दलातर्फे केला जाईल. यासाठी प्रसंगी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू,’’अशी ग्वाही उर्जामंत्र्यांनी यावेळी दिली.

Related Stories

मुंबईतील लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Archana Banage

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Archana Banage

महाविकास आघाडी 2009 लाच होणार होती, आढळरावांचा गौप्यस्फोट

datta jadhav

चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त

datta jadhav

महाराष्ट्रात 5,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Tousif Mujawar

Ratnagiri : सर्व्हर डाऊनमुळे ‘टपाल’ खाते कोलमडले; देशभरात परिणाम

Abhijeet Khandekar