Tarun Bharat

मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून फीवसुली करू नका

समाज कल्याण विभागाचे महाविद्यालयांना आवाहन

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिष्यवृत्तीधारक पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील फी प्राप्त नसल्याने काही शिक्षण संस्था संबंधित वर्षाची फी आकारल्याशिवाय विद्यार्थ्यांचे कागदपत्र देण्यास मनाई करत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये या शासनाच्या आदेशानुसार जिह्यातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित फी रकमेसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व इतर कागदपत्रांची अडवणूक केल्यास संबंधित महाविद्यालयावर शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा व इतर योजनांचा लाभ दिला जातो. जिह्यातील शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सुरू असणाया महाविद्यालयांनी महाविद्यालयामध्ये प्रवेशिक शिष्यवृत्तीधारक पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये. या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

Related Stories

मेगा भरती विरोधात मराठा क्रांतीचे आंदोलन तीव्र

Archana Banage

…अन्यथा सरकारनं रस्त्याच्या लढाईला तयार राहावं; FRP वरुन राजू शेट्टी आक्रमक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : क्लिनिकमधील डॉक्टर ठरताहेत तारणहार!

Archana Banage

म्युकर मायकोसिसचा वेगाने फैलाव

Archana Banage

मुंबई जिल्हा बँकेचा घोटाळा बाहेर काढा : राजू शेट्टी

Archana Banage

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडीने पुढे नेला : बाळासाहेब थोरात

Abhijeet Khandekar