Tarun Bharat

मागीलवर्षी आकारलेली सेसची रक्कम अखेर परत

नगरविकास खात्याकडे तक्रार केल्यानंतर 2021-22 च्या घरपट्टीमधून रक्कम वजा

प्रतिनिधी / बेळगाव

मागीलवषी लॉकडाऊनमुळे कचरा व्यवस्थापन सेस आकारण्यास आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सेस आकारणी करण्याचे मागे घेण्यात आले होते. भरणा केलेल्या मालमत्ताधारकांच्या 2021-22 च्या मालमत्ता करामधून भरलेली रक्कम वजा करण्याची सूचना करण्यात आली होती. पण सदर रक्कम वजा करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार नगरविकास खात्याकडे केल्यानंतर ही रक्कम वजा करून देण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मागीलवषी भरलेली कचरा व्यवस्थापन सेसची रक्कम वजा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आर. डी. कालकुंद्रीकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती केली होती. पण याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्याने कालकुंद्रीकर यांनी नगरविकास खात्याला पत्र पाठवून दाद मागितली. याबाबत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. याची दखल घेऊन मागीलवषी भरलेली कचरा व्यवस्थापन सेसची रक्कम वजा करून नवीन चलन देण्याची सूचना संगणक शाखेतील अधिकाऱयांना बजावली. त्यामुळे 2021-22 च्या घरपट्टीमधून कचरा व्यवस्थापन सेस वजा करून घरपट्टीचे चलन देण्यात आले आहे. पण सध्या बेळगाव वन बंद असल्याने घरपट्टी भरण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

मालमत्ता करासोबत कचरा व्यवस्थापन शुल्क आणि कचरा व्यवस्थापन सेसची आकारणी करण्यात येत आहे. मात्र, मागीलवषी कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे कर भरणाऱयांना पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्यात आली होती. पण मालमत्ता करासोबत कचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्यात येत होता. मागील वषीपासून कचरा व्यवस्थापन सेसची रक्कम आकारण्याचा सपाटा महापालिकेने चालविला आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांकडून स्वच्छता व्यवस्थापन शुल्काच्या नावाखाली दुप्पट शुल्क आकारणी चालविली आहे. कचरा व्यवस्थापन सेस आकारणीस आक्षेप घेऊन माजी नगरसेवक संघटनेने महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले होते. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सेस आकारण्याचे थांबविण्यात आले होते. ज्या मालमत्ताधारकांनी कचरा व्यवस्थापन शुल्क भरला आहे, त्यांची रक्कम 2021-22 च्या घरपट्टीमधून वजा करण्याची सूचना केली होती. पण मागीलवर्षी कचरा व्यवस्थापन सेस व शुल्क दोन्ही भरलेल्या मालमत्ताधारकांच्या 2021-22 च्या घरपट्टीमधून महापालिकेकडून रक्कम वजा करण्यात आली
नाही.  

घरपट्टीमधून मागीलवर्षीची रक्कम वजा करून घेण्याचे आवाहन

शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या आर. डी. कालकुंद्रीकर यांनी वेळेत घरपट्टी भरणा केली होती. त्यामुळे घरपट्टीसोबत कचरा व्यवस्थापन शुल्क आणि कचरा व्यवस्थापन सेस भरणा केला होता. त्यामुळे महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्याकडून लॉकडाऊन काळात आकारण्यात आलेला कचरा व्यवस्थापन सेस 2021-22 च्या घरपट्टीमधून वजा करणे आवश्यक होते. पण त्यांच्या घरपट्टीमधून ही रक्कम वजा केली नसल्याने याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे विचारणा केली असता, सदर रक्कम वजा करण्याची तरतूद संगणकीय चलनात नसल्याचे सांगण्यात आले होते. संपूर्ण घरपट्टी भरण्याची सूचना केली. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत तीन मालमत्तांच्या घरपट्टीद्वारे भरून घेण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन सेस घरपट्टीमधून वजा करण्यात यावा, अशी मागणी कालकुंद्रीकर यांनी नगरविकास खात्याला पत्र पाठवून केली होती. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल महापालिका आयुक्तांनी घेतली असून मागीलवषी भरलेला कचरा व्यवस्थापन सेस यंदाच्या घरपट्टीमधून वजा करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी मागीलवषी कचरा व्यवस्थापन सेस भरला आहे, त्यांनी याबाबत मनपा अधिकाऱयांना माहिती देऊन घरपट्टीमधून ही रक्कम वजा करून घ्यावी, असे आवाहन कालकुंद्रीकर यांनी केले
आहे. 

Related Stories

मारुतीराया कोरोनाचे संकट दूर कर

Amit Kulkarni

सांबरा येथील लिंगायत स्मशानभूमीच्या विकासाला प्रारंभ

Patil_p

केएलई रोडवरील वृक्षाची धोकादायक फांदी हटवण्याची मागणी

Amit Kulkarni

जनावरांना भाज्यांचा पाला घालताना सावधगिरी बाळगा

Patil_p

कसाईखाना-शेडच्या लिलावाकडे व्यावसायिकांची पाठ

Amit Kulkarni

कंजूमर फोरम न्यायालयासाठी खानापूर बार असोसिएशनचा रास्तारोको

Tousif Mujawar