Tarun Bharat

मागील सप्ताहात टॉपच्या कंपन्या नुकसानीत

Advertisements

दहापैकी सहा कंपन्यांना 78,275 कोटींचा फटका, रिलायन्सचा फटका 20 हजार कोटींवर

वृत्तसंस्था/ मुंबई

मागील सप्ताहात देशातील शेअर बाजारातील घसरणीचा प्रभाव काही कंपन्यांच्या बाजारमूल्यावर परिणाम करणारा ठरला आहे. यामध्ये मुंबई शेअर बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजारमूल्य जवळपास 78,275.12 कोटी रुपयांनी नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. रिलायन्सचाही यात समावेश आहे.

सदर कंपन्यांमध्ये प्रामुख्याने दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक म्हणजे 20,666.46 कोटींचा फटका बसला असून या घसरणीसोबत रिलायन्सचे बाजारमूल्य घटून 13,40,213.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मागील आठवडय़ात एचडीएफसीचे बाजारमूल्य टॉपवर राहिले असून एक सप्ताहात एचडीएफसीच्या बाजारमूल्यात 12,609.98 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीसोबत एचडीएफसीचे मूल्य वाढून 3,21,014.11 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. या व्यतिरिक्त आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि आयटीसीचे बाजारमूल्य तेजीत राहिले असल्याचे दिसून आले आहे.

 दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजसह टीसीएस, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनि, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.

Related Stories

15 हजार कोटी जमवण्यासाठी ऍक्सीस बँकेला परवानगी

Patil_p

मित्रों ऍपचे 10 कोटी वापरकर्ते करण्याचे उद्दिष्ट

Patil_p

कोरोना रुग्णांसाठी आरोग्य विमा दाव्यांच्या नियमात बदल हवा

Omkar B

जगात कच्च्या तेलाची विक्री कमी होणार

Patil_p

मास्टरकार्डवर लागले निर्बंध

Amit Kulkarni

अदानी पोर्टस्ची विस्ताराची योजना

Patil_p
error: Content is protected !!