Tarun Bharat

मागोवा

Advertisements

भागवताच्या एकादश स्कंधावर आधारित एकनाथी भागवत आपण संक्षेपाने पहात आहोत. श्रे÷ भक्तांच्या भक्तीच्या कथा ऐकून आपणही तशी भक्ती करावी अशी प्रत्येक साधकाची इच्छा असते. साधकाचे हे मनोगत भगवंत जाणून असतात. त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या एकादश स्कंधाची रचना मुनींनी केलेली आहे. आदर्श भक्ताची जडणघडण कशी होते हे या एकादश स्कंधात भगवंत उद्धवाला सविस्तर सांगत आहेत.

उद्धवाला केलेला उपदेश उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या अध्यायात आपण अकराव्या स्कंधाचे सार पाहिले. अध्याय दोन ते चारमध्ये नारद वासुदेव संवादाच्या माध्यमातून भागवताचा इतिहास जाणून घेतला. त्यामध्ये जनक राजा व अर्षभ यांची प्रश्नोत्तररुपी चर्चा बघितली. झनक महाराजांच्या औत्सुक्मयपूर्ण प्रश्नांना अर्षभानी अत्यंत समाधानकारक उत्तरे दिली. कायेन वाचा मनसेन्दियैर्वा बुध्यात्मना वा।़नुसृतस्वभावात्। करोति यद्तत्सकलं परस्मै नारायणायैति समर्पयेत्तत् हा भागवतातला सुप्रसिद्ध श्लोक आपण इथेच बघितला. काया, वाचा, मन, इंदिय, बुद्धी आणि आत्मा व स्वभावानुसार जे आपण करतो ते सर्व नारायणाला अर्पण करावे असा या श्लोकाचा अर्थ आहे. पाचव्या अध्यायात श्रीकृष्णाने अवतार कार्य समाप्त करण्याचा मनोदय बोलून दाखवला. ते पाहून दुःखी कष्टी झालेल्या उद्धवाने मला बरोबर घेऊन चला असा त्यांच्यामागे लकडा लावला.

पण हे प्रत्यक्षात शक्मय नव्हते. कारण तशी पात्रता उद्धवामध्ये नव्हती. हे लक्षात घेऊन श्रीकृष्णाने त्याला उपदेश करायचे ठरवले. त्यामागचा मुख्य उद्देश असा की, उपदेशाबरहुकूम वागून उद्धवामध्ये भगवंत सदनी आपणहून जाण्याची पात्रता यावी. जी गोष्ट उद्धवासाठी हिताची आहे ती आपल्याही हिताची आहेच. हे लक्षात घेऊन आपणही भगवंतांनी सांगितले आहे तसे वागण्याचा प्रयत्न करूया.

 सहाव्या अध्यायापासून अकराव्या स्कंधाच्या मूळ विषयाला म्हणजे उद्धवगीतेला सुरुवात होते. प्रथम भगवंत उद्धवाला सद्गुरु माहात्म्य सांगत आहेत. त्यानंतर यदु अवधूत संवाद सांगायला सुरुवात करतात. हा संवाद सात, आठ व नऊ अध्याया पर्यंत चालू राहतो. हा संवाद साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये श्री दत्तात्रेयांनी केलेल्या 24 प्रमुख गुरुंची महती आपण बघितली.

 त्यांची नावे अशी पृथ्वी, वायु, आकाश, अग्नी, चंद्र, जल, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भृंग, हरीण, मासा, पिंगळा नावाची वेश्या, टिटवी, बालक, कुमारी, बाण करणारा लोहार, सर्प, कोळी व कुंभारिण माशी. पंचविसावे परब्रह्म ते प्राप्त होण्यासाठी या 24 गुरुंची उपासना केली पाहिजे. कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या लक्षणामुळे कोणाला गुरु केले ते सर्व अवधुतानी सविस्तर सांगितले. शेवटी अवधूत सांगतात की नरदेह हा सर्वात श्रे÷ गुरु आहे. कारण नरदेहाच्या माध्यमातून साधना करून मोक्ष मिळवता येतो. नरदेह हे काय घबाड आहे, केवढी सुवर्णसंधी आहे हे तरुणपणीच समजून घ्या. ज्याना ही जाणीव नसते ते उपभोग घेऊन त्याचा चोळामोळा करून टाकतात. त्यांना एक एक क्षण मोलाचा आहे याची कल्पना नसते. पण जे भानावर असतात ते हे सर्व जाणून असतात. येथे नववा अध्याय संपतो. ग्रंथ खूप मोठा असल्याने आपणास सर्व सविस्तर संगती लागावी या उद्देशाने आपण आतापर्यंतच्या भागांचा मागोवा
घेतला.

यदु आणि अवधूत यांच्या संवादात आलेली चोवीस गुरुंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली. ब्रह्म हे सर्व ठिकाणी व्यापक आहे, माझ्या स्वतःच्या ठायींही ते अंतर्बाह्य व्यापून आहे, परंतु हे माझे मलाच अद्याप समजले नाही. तेव्हा याला आता काय उपाय करावे बरे? या उद्धवाच्या शंकेला श्रीकृष्णानी उपाय सांगण्यास आरंभ केला. या अध्यायाची सुरुवात नाथमहाराज सामान्य माणूस जीवन कसे वाया घालवत असतो आणि सद्गुरुंच्या प्रवेशानंतर त्याच्या जीवनात कसा आमूलाग्र बदल घडतो हे सांगून करत आहेत.

क्रमशः

Related Stories

रात्र वैऱयाची

Patil_p

पालकांचा कल!

Patil_p

‘स्पेस’ जपताना…

Patil_p

अतिक्रिकेटचे ‘बळी’

Patil_p

कृष्णाआजी

Patil_p

टाळेबंदी उठते आहे, पण भान ठेवा

Patil_p
error: Content is protected !!