Tarun Bharat

माचकर पिता-पुत्रांची अफलातून कामगिरी

Advertisements

अत्यंत बारकाईने तयार केला हुबेहूब ट्रक, वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी साकारली प्रतिकृती

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला. अशाचप्रकारे रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचा सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी ट्रक (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे.

   ओरिजिनल ट्रकला जे बाह्य पार्ट्स दिसतात, त्याप्रमाणे सर्व पार्ट या लॉरीला तयार करण्यात आले आहेत. सर्वच्या सर्व ट्रक अगदी जसाच्या तसा तयार केला आहे. ट्रकची चेसी, हौदा, चाके, समोरील बाजू, मागील बाजू, अंतर्गत रचना, अगदी काचेवरील वायफरही अगदी जसाच्या तसा बनविण्यात आले आहे. यावरून माचकर पितापुत्रांनी किती बारकाईने काम केलेय याची कल्पना येईल. विशेष म्हणजे या ट्रेकचे हेडलाईट पेटतात, इंडिकेटर चमकतात.

    हा ट्रक बनविण्यासाठी त्यांना किमान पाऊण महिना लागला. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीमधील त्यांच्या विश्वकर्मा डेकोरेटर्स या कारखान्यात त्यांनी हा ट्रक बनवला. यासाठी त्यांनी अगदी बारकाईने अभ्यास केला. ओरिजिनल ट्रकचे फोटो काढण्यात आले. मग फुटाला इंच अशी लांबी घेऊन हे हुबेहूब ट्रकचे मॉडेल बनविण्यात आले. ओरिजिनल ट्रक साडेबत्तीस फूट आहे. तर या लाकडी ट्रकची लांबी साडेबत्तीस इंच आहे. ट्रक तयार झाल्यावर रंगकामात रत्नागिरीतील मूर्तीकार, मेकअपमन नरेश पांचाळ, प्रथमेश व चिन्मय पांचाळ यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.

 गौरांग आगाशेतर्फे मित्राला वाढदिवस गिफ्ट

रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यावसायिक व संगीत क्षेत्रातील कलाकार गौरांग आगाशे यांनी त्यांचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मित्र पराग सावंत याला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी हा ट्रक संतोष माचकर यांच्याकडून बनवून घेतला. आज 6 जून रोजी पराग सावंत यांचा वाढदिवस आहे. गौरांग आगाशे यांनी आज परागला ट्रक गिफ्ट केला. गिफ्टमधील हा हुबेहूब ट्रक पाहून पराग चकितच झाले. गौरांग आगाशे नेहमीच मित्रपरिवारासाठी विशेष काही करण्यासाठी धडपडत असतात. यावेळीही त्यांनी अशाप्रकारे संतोष माचकर यांच्याकडून हुबेहूब ट्रक बनवून घेऊन आपल्या विशेष स्वभावाचे दर्शन घडवले.

Related Stories

तिरोडा गावची कन्या मुंबई विद्यापीठात प्रथम

NIKHIL_N

ओटवणे येथील रहिवासी रामचंद्र परब यांचे निधन

Anuja Kudatarkar

सुधारीत… 46 अहवाल निगेटीव्ह, 57प्रतीक्षेत

Patil_p

जिल्हय़ात बँक कर्मचारी आजपासून संपावर

Patil_p

सावंतवाडी सबनीसवाडा येथे विवाहितेची आत्महत्या

Anuja Kudatarkar

कोरोनाग्रस्ताचा मध्यरात्री पोबारा

Patil_p
error: Content is protected !!