Tarun Bharat

माजगाव येथील जाधववाडीचे रमाईनगर असे नामकरण

Advertisements

शासन निर्णयानुसार वाडीचे नामकरण

वार्ताहर /ओटवणे
माजगाव येथील जाधववाडीचे शासन निर्णयानुसार रमाई नगर असे नामकरण करण्यात आले. या वाडीच्या रमाई नगर नामफलकाचे अनावरण माजगाव सरपंच दिनेश सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. जाधववाडीचे रमाई नगर असे नामकरण करण्यात आल्याने या वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यातील गावांसह वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या शासन निर्णयानुसार माजगावातील जाधववाडीचे रमाई नगर असे नामकरण करण्यात आले. या वाडीतील बहुतांशी घरे रमाई घरकुल योजना अंतर्गत बांधण्यात आल्याने या वाडीला रमाबाईनगर नाव देण्यात आले. या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी सरपंच दिनेश सावंत, उपसरपंच संजय कानसे, सुरेश सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा, पोलीस पाटील विनोद जाधव, बौद्ध उपासक नारायण आरोंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी पी जाधव तर आभार अमित जाधव यांनी मानले.

Related Stories

घोटगे गावाला पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा फटका

Ganeshprasad Gogate

सावंतवाडीत 38 जण ‘पेड क्वारंटाईन’

NIKHIL_N

मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र ‘एक्सप्रेस वे’

Abhijeet Shinde

आणखी नऊ, एकूण ‘पॉझिटिव्ह’ 130

NIKHIL_N

एकाच दिवशी कोरोनाचे सात बळी

NIKHIL_N

पॅरोलवर सुटलेले दोघे अलगीकरण कक्षात

NIKHIL_N
error: Content is protected !!