Tarun Bharat

माजी आमदाराकडून बाजार समितीच्या सभेत संचालकास मारहाण 

प्रतिनिधी तरुण भारत संवाद / सोलापूर

सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी पूर्ववैमनस्यातून व गैरव्यवहार प्रकरणी आरोप असलेल्या कर्मचाऱयाच्या नेमणुकीस विरोध केल्याच्या रागातून भर सभेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन संचालक श्रीमंत नारायण बंडगर (वय 45, रा. पाथरी ता. उ. सोलापूर) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कृषी उत्पन बाजार समितीत 39 कोटी रुपयांचा गैरव्यवहार व फसवणूक केल्याप्रकरणी मे 2018 मध्ये संचालक श्रीमंत बंडगर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन 39 संचालक आणि तत्कालीन लिपिक उमेश वळवी यांच्यावर शासनातर्फे कारवाई करण्यात आली होती. सोलापूर जिल्हा न्यायालयाने आरोप असलेल्या संचालकांचे जामीन फेटाळले होते. त्यानंतर सर्वांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविला आहे. तर वळवी यांचाही जामीन मंजूर करण्यात आला होता.

यानंतर कृषी उत्पन बाजार समितीमध्ये सचिव म्हणून शासनाकडून व्यक्तीची नेमणुक करण्यात आली होती. त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने व पुन्हा मुदत वाढ मिळू न शकल्याने त्यांना पदावरुन कमी करण्यात आले आहे. त्या रिक्तपदावर सुमारे 15 दिवसांपूर्वी उमेश वळवी यांना सभापती माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रभारी सचिव म्हणून पदभार दिला आहे. वळवी यांच्या नेमणुकीनंतर गुरुवारी कृषी उत्पन बाजार समितीच्या सभागृहात पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या वळवी यांच्या नेमणुकीस बंडगर यांनी हरकत घेतली आणि त्यांच्याकडे प्रभाची सचिव पदाचा पदभारास देण्यास विरोध केला. व त्यांना सचिव पदाचा पदभार देण्याचे कारण बंडगर यांनी विचारले.

बंडगर यांनी वळवी यांच्या नेमणुकीस घेतलेल्या हरकतीमुळे चिडलेल्या माजी आमदार दिलीप माने त्यांच्या समोरील पॅड भिरकावून मारला. त्यानंतर  सभागृहाच्या बाहेर कसा पडतो, तुला आता सोडत नाही असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी माजी पालकमंत्री तथा सभापती विजयकुमार देशमुख तसेच इतर संचालक सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाला माजी आमदार माने यांच्यापासून धोका असल्याने संरक्षणांची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी संचालक बंडगर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माजी आमदार दिलीप माने विरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक करंडे करीत आहेत.

Related Stories

बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला आम्ही विसरलो नाही : ओवैसी

prashant_c

सोलापूर : बार्शी शहरासाठी राबवणार ‘वैराग पॅटर्न’ : प्रांताधिकारी निकम

Archana Banage

कोणतेही खाते कमीपणाचे मानले तर तो जनतेचा अपमान : संजय राऊत

prashant_c

गुजरात दंगलीतील 17 आरोपींना जामीन

prashant_c

ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी 5.76 अब्जाचे इनाम

prashant_c

जिल्हयाच्या सर्व सीमा कडेकोटपणे बंद करा : पालकमंत्री अमित देशमुख

Archana Banage
error: Content is protected !!