Tarun Bharat

माजी आमदार दिलीप मानेंच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Advertisements

तांदुळवाडी/ वार्ताहर

सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या कारची दुचाकीस्वारास समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शहाजी राऊत (वय 55, रा. तांदूळवाडी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दिलीप माने आणि त्यांचा चालक किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे आज, मंगळवारी (दि.14) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार माने हे आपल्या कारने म्हसवडकडे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी तांदुळवाडीनजीक साळमुख रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालय शेजारी त्यांच्या कारची समोरून येणार्‍या दुचाकीस जोराची धडक झाली. यात दुचाकीस्वार शहाजी राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मयत राऊत यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला. तर माजी आमदार माने यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Related Stories

तावडेंना दिल्लीतील शाळा दाखवा आणि परत पाठवा : केजरीवाल

prashant_c

ठाकरे आडनाव नसतं, तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते : गुलाबराव पाटील

prashant_c

देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

Abhijeet Shinde

नाईट लाईफबद्दल पुणेकरांना मान्य होईल असाच निर्णय घेण्याचा विचार

prashant_c

वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्न विषबाधा

sachin_m

महाविकास आघाडीचे सरकार अनैतिक : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!