Tarun Bharat

माजी आमदार निशिगंधा मोगल यांची सरस्वती वाचनालयाला भेट

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरे गल्ली, शहापूर येथील सरस्वती वाचनालयाला भाजपच्या नाशिक येथील माजी आमदार निशिगंधा मोगल व जिल्हा सरसंघचालक राजाभाऊ मोगल यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. वाचनालयातर्फे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी त्यांचे स्वागत केले.

राजाभाऊ मोगल हे संघाचे ज्ये÷ कार्यकर्ते असून कृतकोटी शंकराचार्य न्यास या संस्थेचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते. नाशिकचे प्रसिद्ध बालाजी मंदिर व शंकराचार्य संकुल त्यांच्याच प्रयत्नाने बांधले गेले आहे. त्यांनी लोकसत्तेतील सरस्वती वाचनालयावरील लेख वाचून वाचनालयाला देणगी दिली होती. डॉ. निशिगंधा मोगल यांनी आपल्या स्त्री धनाद्वारे 20 लाख रुपये केंद्रीय सैनिक कल्याण निधीला देणगीदाखल दिले आहेत.

याप्रसंगी राजाभाऊ यांचे मामा व अभ्यास प्रभाकर कुलकर्णी, शिल्पा व साहिल लांडगे, आर. एम. करडीगुद्दी, विजय देशपांडे, सुभाष इनामदार आदी उपस्थित होते. 

Related Stories

रबर-फोम शीटच्या मखरांनी सजली बाजारपेठ

Amit Kulkarni

राजश्री तुडयेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

Patil_p

हेस्कॉमच्या 150 कर्मचाऱयांचे योगदान

Amit Kulkarni

आयसीएमआर, बिम्स-किम्समध्ये समन्वय करार

Amit Kulkarni

शहरातील विविध भागात पाणी टंचाई

Amit Kulkarni

बेळगावमधील राज्यस्तरीय स्पर्धेत बॅकस्ट्रोकमध्ये दोन नवे विक्रम

Amit Kulkarni