Tarun Bharat

माजी आमदार लवू मामलेदार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रतिनिधी /पणजी

फोंडय़ाचे माजी आमदार आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी लवू मामलेदार यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून काँग्रेस गोव्यातील लोकांसाठी मोठय़ा मनाने काम करत आहे आणि काँग्रेसचे सरकार असतना या पक्षाने गुणवत्तेर नोकऱया दिल्या असे म्हटले.

“काँग्रेसच्या राजवटीत कुणालाही पैसे न देता मी पोलिस दलात भरती झालो. तेव्हा नोकरी गुणवत्तेवर मिळत होती., असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसी उपाध्यक्ष एम के शेख आदी उपस्थित होते.

“2007 मध्ये पोलिस उप अधिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर मी राजकारणात प्रवेश केला आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत मगोच्या तिकिटावर विजयी झालो. पण 2017 मध्ये माझा पराभव झाला. मगो सोबत काही मतभेद होते आणि म्हणून मी या पक्षातून बाहेर पडलो.” असे ते म्हणाले.

“मी टीएमसी सोडली कारण मला मगोच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर बसायचे नव्हते. टीएमसीमध्ये सामील झालेल्या नेत्यांना तिकिटांचे खोटे आश्वासन मिळत  असल्याने ते कधीही पक्ष सोडतील. त्यांनी प्रशांत किशोर यांच्या आयपॅक टीमवर आरोप करताना म्हटले की ते भाषण सुद्धा लिहून देत होते आणि स्वताच्या विचारांना तिथे काहीच किंमत नव्हती.

Related Stories

गुरूपौर्णिमा उत्सव कुडाळ माडय़ाच्यावाडीत उत्साहात साजरा

Amit Kulkarni

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपासून

Amit Kulkarni

ब्रह्माकुमारीतर्फे वानरमाऱयांना मदत

Omkar B

सावईवेरे सातेरी देवीचा रथोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

देव बोडगेश्वरच्या अध्यक्षपदी आनंद भाईडकर यांची हॅट्रिक

Amit Kulkarni

डॉ. चंद्रकांत शेटये यांचा आज वाढदिवस

Amit Kulkarni