Tarun Bharat

माजी आमदार संभाजी पवार अनंतात विलिन

प्रतिनिधी / सांगली

भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, बिजलीमल्ल आणि माजी आमदार पैलवान संभाजी हरि पवार (वय 80) यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वखारभागातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षापासून ते पार्कीसन्स या विकाराने आजारी होते. सांगली शहरातून अंत्ययात्रा काढून अमरधाम स्मशानभूमीजवळील मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी 17 रोजी सकाळी साडेनऊला रक्षाविसर्जन होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयंत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांकडून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संभाजी पवार यांच्या पश्चात पत्नी, पुत्र पृथ्वीराज, गौतम, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

संभाजी पवार यांच्यावर मागील काही वर्षापासून मुंबईत उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसामध्ये मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाची वार्ता शहरभर वाऱयासारखी पसरली. विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी व लोकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री मदन पाटील, सहकारतपस्वी बापूसाहेब पुजारी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, रिपाइंचे नगरसेवक विवेक कांबळे नगरसेविका स्वाती शिंदे आदींनी संभाजी पवार यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

दुपारी बारा वाजता सजविलेल्या ट्रक्टरमधून वखारभागातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. पटेल चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, बालाजी चौकमार्गे मारुती चौकात आल्यावर त्यांच्या कार्यालयासमोर काही काळ लोकांच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. केशवनाथ मंदिराजवळील आद्य बजरंग तालिम येथेही गावभागातील लोकांसह मल्लांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तेथून भजनी मंडळासह अंत्ययात्रा अमरधाम स्मशानभूमीजवळील मैदानाकडे दुपारी दीडच्या सुमारास पोहोचली. आप्पांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी सांगली कोल्हापूर, सातारा जिल्हÎातून मल्ल व विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी गर्दी केली होती.
धार्मिक विधी पार पडल्यानंतर पुत्र पृथ्वीराज व गौतम यांनी संभाजी पवार यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपिचंद पडळकर, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, व्यापारी अरूण दांडेकर, शेकापचे ऍड. अजित सूर्यवंशी, पानपट्टी असोसिएशनचे अजित सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, ज्योती आदाटे,  प्रकाश सूर्यवंशी यांची संभाजी पवार यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे झाली.

शिवसेनेचे दिगंबर जाधव, काँग्रेसचे उदय पवार, पेठचे भाजप नेते राहुल महाडिक, शेखर माने, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेवक राजेश नाईक, आनंद परांजपे, बटू बावडेकर, राजू बावडेकर, संजय सावंत, नगरसेवक युवराज बावडेकर, विजय घाडगे, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार, सुब्राव मद्रासी, बाळासाहेब गोंधळे, संतोष देवळेकर, राजाराम गरूड, प्रकाश बिरजे, जि.प. सदस्य विशाल चौगुले, नगरसेवक अभिजित भोसले, सुजित राऊत, आसिफ बावा, ऍड. अमित शिंदे, अंकुश जाधव, शैलेश पवार, नितीन चौगुले, सतीश साखळकर सुरेशदादा पाटील, हायूम सावनूरकर, बाबा कदम यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मारुती चौकात अश्रूंचा बांध फुटला

संभाजी पवारांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानाबरोबरच मारुती चौकातही मोठी गर्दी झाली होती. त्यांचे पार्थिव मारुती चौकात आणताच हणमंतराव पवार, आनंद परांजपे, बटू बावडेकर, सुब्राव मद्रासी, बाळासाहेब गोंधळे, संतोष देवळेकर, प्रमोद कुदळे यांच्यासह भाजीविक्रेते, रिक्षाचालक यांना अश्रू अनावर झाले. शिवाजी मंडईसह, दत्त मारुती रोड, तरुण भारत व्यायाम मंडळ परिसर, गावभाग आदी ठिकाणचे व्यवहार बंद ठेवून संभाजीआप्पांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

माजी आमदार संभाजी पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना राज्यातील विविध पक्षांच्या नेतेमंडळीकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

सांगली : ऊसतोड मजूरांकडून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा

Archana Banage

कोयना, वारणा फुल्ल; नदीकाठ धास्तावला

Archana Banage

बागणीत अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यास पोलिसांनी पकडले

Archana Banage

सांगली : तासगावात कोरोनाने पुन्हा तिघांचा बळी

Archana Banage

सांगली : कडेगाव तालुक्यातील शिवणी गावात मगरीचा वावर

Archana Banage

सांगली : कोरोनाने 21 जणांचा मृत्यू, 331 रूग्ण वाढले

Archana Banage
error: Content is protected !!