Tarun Bharat

माजी आयपीएस असीम अरुणांचा भाजपप्रवेश

Advertisements

कनौज मतदारसंघाची मिळणारी उमेदवारी

कानपूरचे माजी पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. अरुण यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लखनौमध्ये भाजप कार्यालयात पोहोचून त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी त्यांना सदस्यत्व प्रदान केले.

असीम अरुण यांच्या वडिलांनी दलित, वंचितांसाठी काम केले. त्यांच्या वडिलांनी गुंडांपासून लोकांना वाचविले. असीम अरुण यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींच्या धोरणांना पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्वतंत्रदेव यांनी म्हटले आहे. पूर्वीच्या शासनकाळात गुंडांना सोडण्यासाठी राजकीय नेते फोन करायचे. परंतु योगी सरकारच्या काळात कधीच असे घडले नसल्याचा दावा असीम यांनी केला आहे.

पोलिसांना चांगला अनुभव

आणखीन अधिक सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय क्षेत्र निवडण्याचा सल्ला भाजपने दिला. स्वतःच्या कार्यकाळादरम्यान अनेक कामे मला करता आलेली नाहीत. अशी कामे पूर्ण करण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. नेतृत्वाचा विकास करणारा भाजप हा एकमात्र पक्ष आहे. पोलिसांना काम करण्यासाठी भाजप सरकारपेक्षा अधिक चांगला अनुभव असू शकत नसल्याचे उद्गार असीम यांनी काढले आहेत.

दंगलखोरांचा सपमध्ये प्रवेश

समाजवादी पक्षात दंगल घडविणारे प्रवेश करत आहेत. तर दंगल रोखणारे भाजपमध्ये येत आहेत. समाजवादी पक्षाची यादी पाहिल्यास त्यांचे उमेदवार तुरुंगात किंवा जामिनावर असल्याचे दिसून येईल असे विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.

Related Stories

गतवैभव मिळवून देणार नवे शिक्षण धोरण शिक्षणमंत्री पोखरियाल यांचे प्रतिपादन

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात आठवा बळी

Abhijeet Shinde

‘कोरोना’चा उतार

Patil_p

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Abhijeet Shinde

सांगली : कृष्णेचे पाणी सकाळी 52 तर सायंकाळी 47 फूट होईल

Abhijeet Shinde

मिरजेत नवे 14 रुग्ण, राजकीय नेत्यासह दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!