Tarun Bharat

माजी ऑलिम्पियन्सना प्रशिक्षणासाठी निमंत्रण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील इलाईट गटातील तसेच युवा ऍथलीट्सचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने (साई) साहाय्यक प्रशिक्षकांसाठी माजी ऑलिंपिकपटू आणि पॅरा ऑलिंपिकपटूंना निमंत्रण देण्याचे ठरविले आहे.

देशातील नवोदित युवा अथलीट्स आणि इलाईट गटातील क्रीडापटूंचा दर्जा उंचावण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने ही नवी योजना अमलात आणण्याचे ठरविले आहे. साहाय्यक प्रशिक्षक (लेव्हल 6) आणि प्रशिक्षक (लेव्हल 10) पदासाठी साईने भारताच्या माजी ऑलिंपिकपटू तसेच माजी पॅरा ऑलिंपिकपटूंना नियुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या माजी ऑलिंपिक ऍथलीट्सना साईमध्ये प्रशिक्षण देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक माजी ऍथलीट्सनी या पदासाठी 5 ते 26 जानेवारीपर्यंत आपले अर्ज साईकडे पाठविणे जरूरीचे आहे. साईतर्फे या नव्या योजनेमध्ये 11 माजी ऑलिंपिकपटू आणि तीन माजी पॅरा ऑलिंपिकपटू यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Related Stories

‘टी-20’ सामन्यात पंतच्या नेतृत्वाची ‘कसोटी’

Patil_p

आयपीएलमधील सर्व कर्णधार ठरले, अपवाद फक्त आरसीबीचा!

Patil_p

विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत

Patil_p

चौथ्या दिवशीही पाऊस ‘जिंकला’!

Patil_p

पृथ्वी शॉ हॉस्पिटलमध्ये

Patil_p

भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत

Patil_p
error: Content is protected !!