Tarun Bharat

माजी कर्णधार अहमदझाई अफगाण क्रिकेट संचालकपदी

Advertisements

वृत्तसंस्था/ काबुल

अफगाणचा माजी कर्णधार आणि वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक रईस अहमदझाईची अफगाण क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे. अफगाण क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने ही माहिती सोमवारी दिली.

अफगाण क्रिकेट संचालकपदाची जबाबदारी यापूर्वी अँडी मोलेस यांच्याकडे सोपविण्यात आली होती. आता अहमदझाई यांची मोलेस यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. आता अहमदझाई क्रिकेट संचालकपद आणि निवड समिती प्रमुख अशी दुहेरी भूमिका स्वीकारत आहेत. माजी कर्णधार अहमदझाईने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत पाच वनडे आणि आठ टी-20 सामन्यात अफगाणचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अहमदझाईने क्रिकेट प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश केला.

Related Stories

ओसाका, हॅलेप, गॉफ, साबालेन्का यांची विजयी सलामी,

Patil_p

विराटने ब्रेक घेणे आवश्यक : शास्त्री

Patil_p

भारत अ संघाचा एकतर्फी वनडे मालिका विजय

Patil_p

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेतील अंतिम फेरी लांबणीवर

Patil_p

शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन महिलांचा रोमांचक विजय

Patil_p

शाहू स्टेडियमवर ‘जय शिवाजी’..!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!