Tarun Bharat

माजी कर्णधार सर्फराज अहमदला दंड

वृत्तसंस्था/ कराची

स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पाकचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने असभ्य भाषेचा वापर केल्याने पाक क्रिकेट मंडळाने त्याला दंड केला आहे. या निर्णयामुळे सर्फराज अहमदला सामना मानधनातून 35 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

कैद ए आझम चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात 33 वर्षीय सर्फराज अहमद सिंध इलेव्हन संघाचे नेतृत्व करीत होता. शनिवारच्या सामन्यात सर्फराज अहमदने पंचाच्या निर्णयावर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केल्याने त्याच्यावर शिस्तपालन नियमाची कारवाई करण्यात आली. या स्पर्धेत सेंट्रल पंजाब संघातील फलंदाज उस्मान सल्लाउद्दीन यानेही मैदानावर बेशिस्त वर्तन केल्याने त्याला सामना मानधनापैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

Related Stories

‘परफेक्ट क्लायमॅक्स’साठी भारतीय संघ महत्त्वाकांक्षी

Patil_p

अडचणींचा डोंगर सर करण्याचे आव्हान

Patil_p

स्वीडनमधील स्पर्धेसाठी महिला फुटबॉल संघ जाहीर

Patil_p

अपूर्वी, इलावेनिलला एअर रायफलमध्ये अपयश

Patil_p

पंडय़ा बंधू, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघात दाखल

Patil_p

भारतीय महिला तिरंदाज फ्रान्समध्ये दाखल

Patil_p