Tarun Bharat

माजी केंद्रीयमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

Advertisements

मंगळूरच्या येनपोय इस्पितळात सुरू होते उपचार – पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त व्यक्त

प्रतिनिधी/ बेंगळूर

काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. जुलै महिन्यात योगसराव करताना पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मंगळूरच्या येनपोय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी ब्लॉसम फर्नांडिस, मुलगा ओशन आणि मुलगी ओशनी असा परिवार आहे.

ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील शोक व्यक्त केला असून ऑस्कर फर्नांडिस यांच्या पत्नी ब्लॉसम फर्नांडिस यांचे फोनवरून सांत्वन केले.

19 जुलै 2021 रोजी मंगळूरमधील निवासस्थानी योगासन करत असताना ऑस्कर फर्नांडिस खाली कोसळले होते. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  मेंदूतून तीव्र रक्तस्त्राव झाल्याने ते कोमामध्ये होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सुमारे पाच दशके राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहिलेल्या ऑस्कर फर्नांडिस यांचा जन्म 27 मार्च 1941 रोजी उडुपी येथे झाला होता. उडुपी मुन्सिपल कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1980, 1984, 1989, 1991 आणि 1996 अशा सलग पाच निवडणुकीत ते उडुपी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 1998 पासून चार वेळा राज्यसभेचे सदस्यपदही त्यांनी भूषविले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या कालावधीत त्यांनी केंदीय रस्ते परिवहन, महामार्ग आणि कामगार खात्याचे मंत्री म्हणून काम केले होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य सचिवपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. राजीव गांधी तसेच सोनिया गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते.

Related Stories

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; पाहा तुमच्या शहरातील दर

Tousif Mujawar

कोरोना सामग्रीवर करकपात शक्य

Amit Kulkarni

अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू

datta jadhav

‘रोज यांच्या घरात पेनड्राईव्ह बाळंत होतात का?’

Archana Banage

अरुणाचल प्रदेशात दिसले दुर्लभ सोनेरी बदक

Patil_p

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर

Tousif Mujawar
error: Content is protected !!