Tarun Bharat

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज खानापूर तालुका दौऱयावर

‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ पुस्तकाचे होणार प्रकाशन

प्रतिनिधी /खानापूर

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मंगळवार दि. 1 मार्च रोजी खानापूर तालुका दौऱयावर येणार आहेत. या दौऱयात ते तालुक्यातील कक्केरी गावाला भेट देणार असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे.

बाराव्या शतकातील ज्येष्ट वचनकार आणि महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखालील कल्याण क्रांतीनंतर वचन रक्षणासाठी बलिदान देणारे शरण डोहर कक्कय्या यांचे जीवनचरित्र असलेल्या ‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि. 1 मार्च रोजी कक्कय्यांचे समाधीस्थळ कक्केरी येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या ज्येष्ट नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ हे श्रेष्टशरण डोहर कक्कय्यांच्या चरित्राची सर्वंकष मांडणी करणारे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. पुस्तकासाठी लेखक आणि प्रकाशकांनी दोन हजारहून अधिक कि. मी. प्रवास केला आहे. महाशिवरात्री रोजी कक्केरी येथे शरणश्रेष्ट कक्कय्या यांची मोठी जत्रा असते. या पार्श्वभूमीवर कक्केरी येथे सोलापूरच्या सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे होणाऱया या पुस्तक प्रकाशन सोहळय़ास विलक्षण महत्त्व आहे. दि. 1 मार्च रोजी शिंदे दाम्पत्य व श्रीगुरुदेव आश्रमच्या परमपूज्य गुरुमाता नंदाताई यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर राहणार आहेत. ‘पुस्तकाचे सोलापूरच्या चन्नवीर भदेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे या दोघा लेखकांनी संयुक्तपणे लेखन केले आहे. कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे आणि प्रगती प्रकाशनचे दत्ता थोरे यांनी केले आहे.

Related Stories

दुचाकी अपघातात एक ठार, चारजण जखमी

Patil_p

शिवसेनेने बुजविले स्वखर्चाने खड्डे

Amit Kulkarni

आता विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे बसपास

Patil_p

कोल्ड्रिंक्स चालकांनाही आर्थिक मदत करा

Patil_p

आनंदनगर रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार?

Amit Kulkarni

प्रचारतोफा थंडावल्या, उद्या मतदान

Patil_p