Tarun Bharat

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी गुरुग्राममध्ये अखेरचा श्वास घेतला. अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. अजित सिंह यांचा रिपोर्ट 22 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आले होता. त्यानंतर अजित सिंह यांच्यावर गुरुग्राममध्ये उपचार सुरु होते. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख असलेले अजित सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशचे महत्वाचे नेते होते. अजित सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार जयंत चौधरी यांनी त्यांच्या निधनाची वार्ता दिली आहे.

अजित सिंह हे देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचे सुपुत्र होते. उत्तर प्रदेश मधील बागपत या लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा संसदेत निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी नागरी विमान उड्डाणमंत्री म्हणूनही काम केलं आहे.

Related Stories

नवाब मलिकांना धमकीचा फोन

datta jadhav

शिक्षकांना मिळाली ऑनलाईन ओळखपत्रे : तरुण भारत सोशल मीडिया वृत्ताची घेतली दखल

Archana Banage

खासगीकरणाविरोधात बँकांचा संपांचा इशारा

Patil_p

अंदमानात मान्सूनची चाहूल

datta jadhav

दसरा सोहळ्यास निमंत्रितांनाच प्रवेश

Archana Banage

प्रसिद्धी व फायद्यासाठी माध्यमांमध्ये स्त्रियांचा वापर- प्रा.डॉ. शैलजा माने

Archana Banage