Tarun Bharat

माजी खासदार के. विरुपाक्षप्पा समर्थकांसह भाजपमध्ये

Advertisements

बेंगळूर :  काँग्रेस नेते आणि माजी खासदार के. विरुपाक्षप्पा यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसमवेत भाजप पक्षात प्रवेश केला. बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी विरुपाक्षप्पा यांच्या हाती पक्षाचा ध्वज देऊन भाजपमध्ये स्वागत केले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा, विधानपरिषद सदस्य एन. रविकुमार व इतर नेते उपस्थित होते. कोप्पळ लोकसभा मतदारसंघातून विरुपाक्षप्पा यांनी यापूर्वी निवडणूक जिंकली होती. ते विधानसभेवरही निवडून आले होते. रायचूर जिल्हय़ातील सिंधनूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. आता याच जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

आमदार यत्नाळ यांना पक्षाकडून नोटीस

Abhijeet Shinde

कर्नाटक: येडियुरप्पा यांच्या जागी कोण?; “पक्षश्रेष्ठी आज संध्याकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणार”

Abhijeet Shinde

पीएचसी सुधारित आणि मजबूत केली जाईल: आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटक: भद्रा व्याघ्र प्रकल्पात आढळला वाघिणीचा मृतदेह

Abhijeet Shinde

बेंगळूर: लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा सुरूच

Abhijeet Shinde

50 टक्के लसीकरण केंद्रे बंद : सिद्धरामय्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!