Tarun Bharat

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रतिनिधी / पुणे

जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.

बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.

Related Stories

दमदाटी करुन व्यापाऱयाला मागितली खंडणी

Patil_p

कोरोनामुक्त रुग्ण विठुनामाच्या घोषात घरी परतले

Archana Banage

शहरात मोकाट फिरणारे झाले घरबंद…

Patil_p

शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात : छगन भुजबळ

Tousif Mujawar

मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन अधिकारीपदी भूषण देशपांडे

Archana Banage

”मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी अन् सामान्य माणसा…”

Archana Banage