Tarun Bharat

माजी गरजू क्रिकेटपटूंसाठी 39 लाख रूपयांची मदत

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली असल्याने देशातील काही माजी क्रिकेटपटूंची आर्थिक विवंचनेत आहेत. भारतीय क्रिकेटपटू संघटनेतर्फे अशा गरजू क्रिकेटपटूंना मदत करण्याची योजना आखली असून या योजनेसाठी माजी कर्णधार सुनील गावसकर, कपिलदेव यांनी पुढाकार घेतला. भारतीय क्रिकेटपटू संघटनेतर्फे गरजू 30 क्रिकेटपटूंसाठी 39 लाख रूपयांचा निधी उभा केला आहे.

या योजनेला माजी कसोटीवीर सुनील गावसकर, कपिलदेव, गौतम गंभीर, गुडाप्पा विश्वनाथ यांनी आपला पाठिंबा दर्शविल्याचे संघटना अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले. गावसकर, कपिलदेव आणि गंभीर यांनी वैयक्तिक आर्थिक मदत दिल्याचे समजते. त्याचप्रमाणे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनने आर्थिक मदत देण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

 भारतीय क्रिकेटपटू संघटनेतर्फे इच्छूक क्रिकेटपटूंकडून 15 मे पर्यंत निधी स्वीकारणार आहे. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य अशा पाच विभागातील प्रत्येकी 5 ते 6 गरजू क्रिकेटपटूंची यादी तयार करण्यात आली आहे. काही माजी क्रिकेटपटूंना निवृत्ती वेतन मिळत नाही. तसेच त्यांना कोणतीही नोकरी उपब्ध नसल्याने त्यांची आर्थिक मदतीची गरज आहे. अशा गरजू क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेटपटू संघटनेतर्फे ही मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत 1750 माजी क्रिकेटपटूंनी आपली नावे भारतीय क्रिकेटपटू संघटनेकडे नोंदविली आहेत. गेल्या फब्रुवारीमध्ये भारतीय क्रिकेट मंडळातर्फे (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेला दोन कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे अशोक मल्होत्रा यांनी सांगितले.

Related Stories

लवलिना, मिनाक्षी, प्रीती, परवीन उपांत्य फेरीत

Patil_p

गावसकर बॉक्सचे उद्घाटन लवकरच

Patil_p

माजी हॉकीपटू एमके कौशिक यांना कोरोनाची लागण

Patil_p

दीपिका कुमारी-अतानू दासची सर्वोत्तम कामगिरी

Patil_p

अष्टपैलू पार्नेलला दुखापत

Patil_p

जॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज खेळामुळेच विजय

Patil_p
error: Content is protected !!