Tarun Bharat

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

मुंबई/प्रतिनिधी

१०० कोटी वसुली प्रकरणी आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. ते अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. काल ते ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. अखेर रात्री उशिरा अनिल देशमुखांना १०० कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सोमवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी ११ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. यांनतर त्यांनी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती अखेर ईडीने रात्री त्यांना अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

Related Stories

‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवाचे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते उद्घाटन

Tousif Mujawar

किरकोळ कारणावरून दोन जणांना लाकडी दांडक्याने मारहाण

Archana Banage

आर्वीमध्ये बायोगॅस टाकीत आढळल्या भ्रूणांच्या कवट्या

Abhijeet Khandekar

सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देऊन आंबेडकर जयंती साजरी करा : देवेंद्र फडणवीस

Archana Banage

एसटी स्टॅड मध्ये पोलीसांचा वॉच

Patil_p

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन

Archana Banage