Tarun Bharat

माजी नगरसेवक घेणार नगरविकासमंत्र्यांची भेट

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. बेळगाव शहराच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत. महापालिकेच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, यावेळी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने सकाळी 10 वा. नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवक व पदाधिकाऱयांनी शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी 9.30 वा. महापालिका मुख्य कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव दीपक वाघेला यांनी केले आहे.

शहरातील विविध समस्यांबाबत माजी नगरसेवक संघटनेने महापालिकेला अनेकवेळा निवेदन दिली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. वारंवार समस्यांबाबत पाठपुरावा करूनही दखल घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांची भेट घेण्यात येणार आहे. याकरिता माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

कुडलसंगम पूजावनात चंदन झाडांची चोरी

Patil_p

बसस्थानक आवारात पाण्याची डबकी

Amit Kulkarni

पशुसंगोपन सुरू करणार गो-शाळा

Amit Kulkarni

हात जोडतो, आम्हाला गावी जाऊ द्या…

Patil_p

चन्नम्मा सर्कलमध्ये वाहतुकीची कोंडी

Patil_p

बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धा

Amit Kulkarni
error: Content is protected !!