Tarun Bharat

माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक यांचे निधन

प्रतिनिधी/ कराड

शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक व शिवेसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामभाऊ विष्णू रैनाक (वय 62) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी रात्री उशिरा निधन झाले.

 हिंदुत्ववादी, येथील रैनाक गल्लीतील उदयकला गणेश नवरात्र उत्सव मंडळाचे सर्वेसर्वा असणाऱया रामभाऊ रैनाक यांनी शिवसैनिक म्हणून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला. 1991 साली नगरपालिका निवडणुकीत ते निवडून आले होते. त्या काळात त्यांनी भरीव काम केले होते. उदयकला मंडळाचा नवरात्रोत्सव व्यापक केला. 1996 साली त्यांच्या पत्नी छाया रैनाक या पालिकेत निवडून आल्या. त्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

 1990 साली रामभाऊ यांची शिवसेनेचे कराड शहर प्रमुख म्हणून निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात शहरात सेनेच्या सुमारे चाळीसवर शाखा सुरू करण्यात त्यांना यश आले होते. सेनेचा दबदबा वाढत असल्याने त्याकाळी कराड उत्तर विधानसभेतून रामभाऊंनी लढावे, असा विचार भाजप आणि सेना युतीच्या नेतृत्वाने चालवला होता, असे जुने शिवसैनिक सांगतात. त्यांच्याच शहर प्रमुख पदाच्या काळात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सभा मध्यरात्री एक वाजता शिवाजी स्टेडियमवर झाली होती. संघटन कौशल्य, उपक्रमशीलता व मनमिळावू स्वभावाच्या श्री. रैनाक यांनी शहर, तालुका व जिह्यात शिवसेनेचा प्रसार आणि प्रचार केला. शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्याशीही त्यांचे स्नेहाचे संबंध होते. तीन दशकाहून अधिक काळ कराडसह जिह्यात शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते ते नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तीन वर्षांपासून त्यांच्यावर सातारा उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा होती. त्यासह एस. टी कामगार सेनेच्या कार्यात देखील त्यांनी नेतृत्वाचा ठसा उमटवला. तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या श्री. रैनाक यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अंत्यविधीला खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे-पाटील, हर्षद कदम यांच्यासह माजी नगरसेवक शिवसैनिक, तरूण कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

गुरूवारी 24 रोजी सकाळी 9.30 वाजता वैपुंठ स्मशानभूमीत आहे.

Related Stories

सातारा : निपाणी मुरातली पोरं शिकतात संगणकावर शाळा

Archana Banage

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट

Patil_p

मुलगी देतो म्हणून दोन लाखाची फसवणूक : सात जणांना अटक

Patil_p

सातारा : …अखेर बावधनचं बगाड निघालं

datta jadhav

साताऱ्यात टोळक्याकडून एकाचा दगडाने ठेचून खून

datta jadhav

कराडमध्ये दीड लाखाचा गुटखा पोलिसांनी पकडला

Patil_p