Tarun Bharat

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ, खंडणीप्रकरणी लूकआऊट नोटीस

Advertisements

मुंबई /प्रतिनिधी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहेत. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. यांनतर अनिल देशमुखांची ईडी कडून चौकशी केली जात आहे. तसेच शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४,१२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना मनारे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात आता दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांना दुसरी लूकआऊट नोटीस बजावलीय. याबाबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी ही माहिती दिली. परमबीर सिंह यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ही नोटीस देण्यात आलीय.

मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपाप्रकरणी आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

‘भाजपाच्या ‘या’ निर्णयामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट’

Abhijeet Shinde

‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाहणी

Abhijeet Shinde

विजयसिंह मोरे यांना मातृशोक

Abhijeet Shinde

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

Rohan_P

पुणे विमानतळावर एक किलाे साेन्याची बिस्किटे जप्त

datta jadhav

आम्ही भाजप नेत्यांना चंपा, टरबुज्या म्हणणार नाही, नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!