Tarun Bharat

माजी फुटबॉलपटू, प्रशिक्षक हकिम यांचे निधन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे माजी फुटबॉलपटू व राष्ट्रीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक ऑलिम्पियन सईद शाहिद हकिम यांचे गुलबर्गा येथील एका हॉस्पिटलमध्ये रविवारी निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

हकिम साब या नावाने ते परिचित होते. निधनसमयी ते 82 वर्षांचे होते. अलीकडेच त्यांना हृदयविकाराचा झटला आला होता, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ‘रविवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले,’ असे त्यांच्या पत्नी सादिया सईदा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. गेली पाच दशके ते भारतीय फुटबॉलशी निगडित होते. त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1982 मधील दिल्ली आशियाई स्पर्धेत ते दिवंगत पीके बॅनर्जी यांच्यासमवेत साहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. नंतर ते प्रमुख प्रशिक्षकही बनले होते.

स्थानिक स्तरावर ते महिंद्रा अँड महिंद्रा संघाचे प्रशिक्षक असताना 1998 मध्ये डय़ुरँड चषक स्पर्धेचे त्यांनी जेतेपद पटकावले होते. त्यावेळी बलाढय़ मानल्या जाणाऱया ईस्ट बंगाल संघाचा महिंद्राने पराभव करून जेतेपद मिळविले होते. त्यानंतर गोव्याचे साळगावर क्लब व हिंदुस्तान एफसी संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले होते. बंगाल-मुंबई एफसीचे त्यांनी 2004-05 या मोसमात शेवटचे प्रशिक्षकपद भूषविले होते.

फिफाचे ते मान्यताप्राप्त रेफरी होते. 1988 मध्ये त्यांनी एएफसी आशियाई चषक स्पर्धेत रेफरीचे काम पाहिले आणि त्यांना ध्यान चंद पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. इंडियन एअरफोर्समध्ये ते स्क्वाड्रन लीडर होते. याशिवाय साईच्या विभागीय केंद्रात त्यांनी संचालकपदही सांभाळले होते. 2017 मधील यू-17 फिफा विश्वचषक स्पर्धेआधी ते प्रोजेक्ट डायरेक्टर होते. ‘त्यांचे भारतीय फुटबॉलमधील योगदान कधीही विसरता येणार नाही. देशात फुटबॉलची लोकप्रियता वाढवणाऱया गोल्डन पिढीतील संघाचे ते सदस्य होते, त्यांच्या निधनाने भारतीय फुटबॉलचे मोठे नुकसान झाले आहे,’ अशा शब्दांत एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

1960 रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतला होता. पण 1962 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने फुटबॉलचे सुवर्णपदक मिळविले होते. मात्र या संघात त्यांना स्थान मिळाले नव्हते. सेनादलाकडून खेळताना त्यांनी 1960 मध्ये संतोष करंडक जिंकल्यानंतर 1966 पर्यंत ते या संघातून खेळले होते.

Related Stories

दक्षिण आफ्रिका संघाला दंड

Patil_p

वंदना कटारिया कुटुंबीय प्रकरणाचा कर्णधार राणी रामपालकडून निषेध

Patil_p

चेन्नईकडून दिल्लीचा 91 धावांनी धुव्वा,

Patil_p

अमन, सागर कॅडेट गटातील नवे वर्ल्ड चॅम्पियन

Patil_p

मुष्टियोद्धा विनोद तनवर कोरोनाबाधित

Patil_p

राजस्थान रॉयल्सकडून 7.5 कोटी कोरोना निधी जाहीर

Amit Kulkarni