Tarun Bharat

माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना त्वरित अटक करा

Advertisements

हुबळी/प्रतिनिधी

हुबळी -धारवाड महानगर जिल्हा कॉंग्रेस समितीचे प्रवक्ते रॉबर्ट यांनी माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना अश्लील सीडी प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याने त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली. बुधवारी धारवाड येथे पत्रकार परिषदेत घेत त्यांनी ही मागणी केली.

पीडित महिला ३० मार्च रोजी न्यायालयात हजर झाली आणि यापूर्वी दिलेल्या लेखी निवेदनावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माजी मंत्री रमेश जारकिहोळी हे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात पीडितेचे पालक दबावाखाली येत आहेत आणि कठपुतळीसारखे वागत आहेत. बेंगळूरमध्ये एसआयटीसमोर हजर झालेल्या पीडितेचे पालक नंतर पत्रकार परिषदेत उपस्थित होते जे सर्वश्रुत आहे. पालक एखाद्याच्या दबावाखाली विधानं देत असतात. २ ९ मार्च रोजी पुन्हा बेळगाव येथे पत्रकार परिषद घेत प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांवर कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना आरोप केला गेला, जो निंदनीय आहे. दरम्यान पीडित मुलीच्या पालकांनी बेळगाव येथे येऊन पत्रकार परिषद घेण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला.

सतीश जारकिहोळी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर करताना पीडित मुलीच्या पालकांनी पत्रकार परिषद घेण्याची अचानक काय गरज होती, असे दद्दापुरी म्हणाले. पीडितेचे पालक कुणीतरी लिहिलेले स्क्रिप्ट वाचत आहेत आणि आपल्या मुलीच्या विधानाविरोधात निवेदन देत आहेत. यामुळे पालकही गोत्यात येत आहेत. पीडित मुलीच्या पालकांची त्वरित चौकशी केली पाहिजे, जेणेकरून केवळ पीडितेला न्याय मिळू शकेल. राज्य सरकारने आधी माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना अटक करावी. अटक केली नाही तर कॉंग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त केला जाईल.

Related Stories

एसीबीचे राज्यभरात 80 ठिकाणी छापे

Amit Kulkarni

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी एनआयसीईला २ कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

Abhijeet Shinde

टक्केवारी कमी करूनही ७०० बीडीएस जागा रिक्त

Abhijeet Shinde

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी सायकल रॅली

Amit Kulkarni

बारावीचा निकाल ग्रेड नव्हे; तर गुणांच्या स्वरुपात

Amit Kulkarni

कर्नाटक : राज्यात मंगळवारी ८१५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!