Tarun Bharat

माजी मंत्री रमेश तवडकर निर्दोष

तवडकरांनी मारहाण, धमकी दिल्याचा होता आरोप शिक्षा देण्याचा काणकोण न्यायालयाचा निवाडा रद्दबातल

प्रतिनिधी / मडगाव

 माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना काणकोण न्यायालयाने दिलेली शिक्षा मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केलेली असून तवडकर यांना त्यांच्यावरील आरोपातून निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. धमकी दिल्याच्या एका प्रकरणासंबंधी काणकोण न्यायालयाने तवडकर यांना दोषी ठरवून  कोर्ट उठेपर्यंत न्यायालयात बसण्याची आणि दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला तवडकर यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

 दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्या. एडगर फर्नाडिस यांच्या न्यायालयात या अपिलावरील सुनावणी झाली आणि काल मंगळवार 19 जानेवारी 2021 रोजी न्या. फर्नाडिस यांच्या न्यायालयाने या अपिलावरील निवाडा दिला. तवडकर यांच्यावतीने ऍड. डी. वेर्णेकर यांनी न्यायालयात काम पाहिले.

 तवडकर यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला असे आणून दिले की या प्रकरणातील पुनो वेळीप व मनोहर देसाई हे तथाकथित घटनेनंतर घरी गेले. काणकोण पोलीस स्थानकात पोलीस तक्रार करण्यासाठी लगेचच गेले नाहीत. त्यावेळच्या निवडणुकीसाठी विजय पै खोत हे तवडकर यांचे प्रतिस्पर्धी होते.  पोलीस स्थानकाबाहेर पुनो वेळीप यांच्याबरोबर उमेदवार विजय पै खोत व त्यांचे समर्थकही उपस्थित होते आणि यावरुन ही तक्रार म्हणजे राजकीय प्रेरित असल्यासारखा संशय येत असल्याचे न्यायालयाने निवाडय़ाच्या आठव्या पानावरील परिच्छेदात म्हटलेले आहे.

 तक्रारीची शहानिशा करण्याची तसदी उपनिरीक्षकाने घेतली नाही

तक्रारीत सबंधीत वाहनात आणखी काहीजण होते असे म्हटले होते. मात्र, या प्रकरणातील तपास अधिकाऱयाला संशयित आरोपी सोडल्यास या वाहनातील आणखी  कोणीही मिळाले नाहीत. तक्रारदाराने कारमध्ये असलेल्या काहींची नावे पोलीस तक्रारीत दिली होती. मात्र, तपास अधिकाऱयाने कारमधील कोणाचीही जबानी घेतली नाही.  कारमधील त्या लोकांची जबानी घेणे आवश्यक नव्हते अशी जबानी तपास अधिकाऱयाने न्यायालयात दिली होती.

 न्या. फर्नाडिस यांना असे दिसून आले की जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची शहानिशा करण्याचा पोलीस अधिकाऱयाने विचारही केला नाही आणि त्यामुळे हे सिद्ध होते की तपास अधिकाऱयाने या तक्रारीचा स्वतंत्रपणे तपास केलाच नाही असे न्या. फर्नाडिस यांच्या न्यायालयाने म्हटलेले आहे.

 पंचनाम्यातील वेळेतील विसंगती

या प्रकरणासंबंधी पंचनामा करण्यात आला त्यावेळी अनेकांची जबानी नोंद करण्यात आली होती. मात्र या जबानीत अनेक विसंगती आढळून आल्याचे न्यायालयाने आपल्या निवाडय़ात म्हटलेले आहे.

काणकोण न्यायालयाने संशयित रमेश तवडकर यांना भारतीय दंड संहितेच्या 352 कलमाखाली (मारहाण करणे) आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. मात्र, आपल्यापुढे असलेल्या कागदपत्रानुसार सरकारपक्षाने हा खटला कुठल्याच संशयाविना सिद्ध केलेला आहे असे म्हणता येणार नाही असे सांगून तवडकर याच्याविरुद्धचा काणकोण न्यायालयाचा निवाडा रद्दबातल ठरविला आणि वरील दोन्ही आरोपातून तवडकर याना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.

खटल्याची पार्श्वभूमी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार काणकोण परिसरातील पुनो वेळीप हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. पुनो वेळीप हे आपल्या एका मित्राबरोबर दुचाकीने चावडी – काणकोण येथे जात होते. तीन तळे गुळय़ाजवळ ते पोहोचले तेव्हा पाठीमागे एक पांढऱया रंगाची कार येत असल्याचे दिसून आले होते कारमध्ये संशयित रमेश तवडकर बसलेले होते. वेळीप यांना दुचाकी थांबविण्याची सूचना तवडकर यांनी दिली. मात्र या सूचनेकडे त्यानी लक्ष दिले नाही. काही वेळाने पाठीमागून येणाऱया कारने दुचाकीला ओव्हरटेक केले आणि दुचाकीसमोर कार उभी करण्यात आली. रमेश तवडकर यांनी आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे पुनो वेळीप यांनी काणकोण पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत म्हटले होते.

Related Stories

दाबोळी विमानतळावर एका दिवसात 104 विमानांतून 31 हजार प्रवासी

Amit Kulkarni

संसदीय राजभाषा समितीकडून भारतीय कृषी संशोधन परिषद, गोवा येथे राजभाषा कामाची पाहणी

Amit Kulkarni

पणजीवासियांनी घेतला दुर्मिळ विंटेज कारचा अनुभव

Amit Kulkarni

खोल बेताळ देवस्थानचा आज वार्षिक जत्रोत्सव

Amit Kulkarni

सांखळीत खुद्द मुख्यमंत्र्यांची, फोंड्यात कृषीमंत्र्यांची कसोटी !

Amit Kulkarni

गोवा डेअरीच्या अध्यक्षपदाची निवड आज

Amit Kulkarni
error: Content is protected !!