Tarun Bharat

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही संसर्ग

बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात उपचार

प्रतिनिधी/ बेंगळूर

एकापाठोपाठ अनेक राजकारण्यांना कोरोनाचा विळखा बसत असताना त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना संसर्ग झाला होता. त्यानंतर सिद्धरामय्या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या दोघांवर बेंगळूरच्या मणिपाल इस्पितळात उपचार केले जात आहेत.

कोरोना परिस्थितीत देखील जनतेच्या संपर्कात राहून काम करणाऱया लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे. आता प्रमुख नेत्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी बोलावलेली निजद नेत्यांची बैठक रद्द केली. दरम्यान, सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा नातू धवन याने स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. 2 ऑगस्ट रोजी धवन म्हैसूरमध्ये सिद्धरामय्या यांच्या संपर्कात आला होता.

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोशल मीडियावर राजयकीय नेत्यांनी संदेश अपलोड करत सिद्धरामय्या लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्याचे दिसून आले.

Related Stories

देशात डिस्चार्जपेक्षा बाधितांमध्ये वाढ

Amit Kulkarni

सप 10 मार्चला समाप्तवादी पक्ष ठरणार

Patil_p

दिलीप कुमार यांची आठवण ; पवारांनी सांगितला पहिल्या भेटीचा जेजुरीतील ‘तो’ किस्सा

Archana Banage

भारतात मागील 24 तासात 34,884 नवे कोरोना रुग्ण, 671 मृत्यू

datta jadhav

हिमाचल प्रदेश : एप्रिल – मे महिन्याचे लाईट बिल न भरणाऱ्यांचे तोडणार कनेक्शन

Tousif Mujawar

ऑक्सिजन मृत्यूंसंबंधी केंदाकडून दिशाभूल

Amit Kulkarni
error: Content is protected !!