Tarun Bharat

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील आठ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

दिल्लीतील लष्करी रुग्णालयात मुखर्जी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 9 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.  त्यानंतर 10 ऑगस्टला त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृती आणखी खालावत गेली. ते कोमात असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुखर्जींवर उपचार करत आहे. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. 

Related Stories

निवडणुकीपूर्वी भाजपमधील पलायन सुरूच

Amit Kulkarni

दिल्लीत पुन्हा वाढली कोरोना रुग्ण संख्या; गेल्या 24 तासात 1056 नवे रुग्ण

Tousif Mujawar

पर्यावरण सुरक्षाच मानवाच्या अस्तित्वाची शाश्वती

Patil_p

दीर्घ लढय़ाची मोठी तयारी

Patil_p

राजस्थान : भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

ट्विटर इंडियाच्या ‘एमडी’ विरोधात दुसरा एफआयआर

Patil_p