Tarun Bharat

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदमापूरातील संत बाळुमामा चरणी

प्रतिनिधी / सरवडे

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आदमापूर येथील संत बाळुमामा मंदीरास भेट देऊन संत बाळुमामांच्या मुर्तीचे दर्शन घेतले. आज त्यांच्या झालेल्या दौऱ्याचे प्रशासन, मंदिर समिती व ग्रामपंचायत यांनी चांगले नियोजन केले होते.

पाटील यांचे सकाळी पावणे अकरा वाजता आदमापुरात आगमन झाले. प्रथमच त्या या विभागात आल्याने लोकांना उत्सुकता होती. प्रारंभी त्यांनी मंदीरात जावून संत बाळुमामा मुर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने त्यांचा अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, पदाधिकारी यांच्या हस्ते संत बाळुमामांची प्रतिमा व ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांना बाळुमामांच्या जीवनकार्याची महती कार्याध्यक्ष मगदूम यांनी दिली.

त्यानंतर आदमापूर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच विजय गुरव यांच्या हस्ते उपसरपंच राजनंदीनी भोसले, सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पाटील, तहसिलदार अश्विनी वरोटे, पोलिस निरीक्षक संजय मोरे, गट विकास अधिकारी परीट, मंदीर व्यवस्थापक अशोक पाटील, ग्रामसेवक डी बी माने, तलाठी धनाजी पाटील, राजू माळी, सातापा पाटील, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान हॉटेल त्रिवेणीचे मालक सुधीर पाटील, युवा नेते अभिषेक डोंगळे आदींनी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आजच्या दौऱ्याबाबत चोख पोलीस बंदोबस्त व आदमापूर मंदिर परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Related Stories

शाहूपुरी पोलिसांकडून दुचाकी चोरटा अटक, सव्वा लाखाच्या ५ दुचाकी जप्त

Archana Banage

पालकमंत्र्यांच्या तत्परतेची जिल्हय़ाला प्रचिती

Patil_p

सातारा पालिकेत प्रभारी पाणी पुरवठा अभियंता कोरोना बाधित

Patil_p

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना व समाजवादी नायिकाना शहरात अभिवादन

Patil_p

राजू शेट्टी यांनी स्वीकारला आमदारकीचा प्रस्ताव

Archana Banage

आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी हाकले औत

Archana Banage