Tarun Bharat

माजी विद्यार्थ्यांच्या बॅचची सामाजिक बांधिलकी

Advertisements

वाकरे / प्रतिनिधी

कुडीत्रे (ता.करवीर) येथील श्रीराम हायस्कुलच्या २०१३-१४ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. करवीर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याचे काम करणाऱ्या गोरगरीब लोकांना एक महिण्याचे धान्य देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

कोवीड लॉकडाऊनच्या कालावधीत श्रीराम हायस्कूल,कुडित्रे येथील सन २०१३-१४ बॅच”सोलमेट्स” या व्हॉटसअप ग्रूपच्या मुला-मुलींमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली. या मुला-मुलींनी सोशल मीडियाचा वापर करून आपण काहीतरी सामाजिक कार्य करु अशी एक संकल्पना डोक्यात आणली. यातूनच “सोलमेट्स” या व्हॉटसअप ग्रुपवर असणार्‍या सर्व मुलामुलींनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला.

करवीर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या स्वयंभूवाडी ते धनगरवाडी यादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामावर जवळजवळ दहा कुटुंबे आपल्या सर्व कुटुंबासहित काम करत आहेत. या लॉकडाऊनमुळे या कुटुंबांना एका वेळेचे जेवणासाठी लागणारे लागणारे धान्य मिळणे मुश्किल झाले होते. ही बाब या मुलांच्या निदर्शनास आली. या सर्व मुलांनी आपल्याकडे साठवलेले पैसे जमा करून स्वयंभूवाडी ते धनगरवाडी यादरम्यान रस्त्याचे काम करणाऱ्या सर्व कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे धान्ये देण्याचे ठरवले. या कुटुंबांना महिन्याभराचे तांदूळ, तूरडाळ, साखर, गोडेतेल, चहापूड, मीठ, बिस्कीटपुडे अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक आदर्श सामजिक उपक्रम राबविला आहे.

या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. हा उपक्रम आसाच निरंतन सुरू ठेवणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. तसेच समाजात गरजू व गरीब असणाऱ्या लोकांना आम्ही यापुढे ही मदत करणार आहोत. असे सांगीतले. या करिता सोलमेट्स या ग्रुप शी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Related Stories

मोटरसायकल आणि कारची समोरासमोर धडक; तरूण गंभीर

Abhijeet Khandekar

सी. ए. परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

Abhijeet Shinde

महापूराच्या कारणमीमांसेवर मार्च महिन्यात कोल्हापूरात जनपरिषद

Sumit Tambekar

Kolhapur; राधानगरी येथे युवकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

Abhijeet Khandekar

खरीप आपत्कालीन पीक आराखडा तयार

Abhijeet Shinde

शिवजन्म पाळण्याचे शाहू छत्रपती यांचे हस्ते प्रकाशन

Sumit Tambekar
error: Content is protected !!